Wed, Feb 20, 2019 14:29होमपेज › National › #MeToo लैंगिक शोषणाचा आरोप; एम.के.अकबर यांची उचलबांगडी?

#MeToo लैंगिक शोषणाचा आरोप; एम.के.अकबर यांची उचलबांगडी?

Published On: Oct 11 2018 1:41PM | Last Updated: Oct 11 2018 1:41PMनवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

परराष्ट्र राज्य व्यवहार मंत्री एम.जे.अकबर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अनेक महिलांनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर पक्ष किंवा सरकार त्यांच्यावर कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सध्या नायझेरियाच्या दौऱ्यावर असलेल्या अकबर यांना दौरा लवकर संपवून भारतात येण्यास सांगितले आहे. राजकारणात येण्याआधी अनेक माध्यम संस्थांमध्ये संपादक राहिलेल्या अकबर यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप काही महिलांनी केला आहे. 

अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर काँग्रेसने त्यावर स्पष्टकरण किंवा राजीनामा देण्यास सांगितले होते. अकबर सध्या नायझेरियाच्या दौऱ्यावर आहेत आणि ते शुक्रवारी भारतात येणार होते. पण आता त्यांना गुरुवारीच परत येण्यास सांगितले आहे. 

भाजपमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले की, सरकार आणि पक्ष त्यांच्या भवितव्याचा विचार करेल. त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपावर विचार सुरु आहे. या प्रकरणी त्यांचे स्पष्टीकरण देखील महत्त्वाचे आहे. 

यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्याआधी विचार केला जाईल. हा महिलांशी संबंधित विषय असल्यामुळे पंतप्रधानांसाठी महत्त्वाचा आहे. ते या विषयाकडे दुर्लक्ष करणार नाहीत, असे सरकारमधील एका सूत्राने सांगितले.