Sun, Nov 18, 2018 17:22होमपेज › National › ‘नीच आदमी’वर मणीशंकर अय्यरांचा माफीनामा

‘नीच आदमी’वर मणीशंकर अय्यरांचा माफीनामा

Published On: Dec 07 2017 5:00PM | Last Updated: Dec 07 2017 6:32PM

बुकमार्क करा


दिल्ली : पुढारी ऑनलाईन 
‘मुझको लगता है की, ये आदमी बहुत नीच किसमका आदमी है, इसमे कोई सभ्यता नही है, ऐसे मोकेपर इस किसमकी गंदी राजनीती करने की क्या आवशकता है?’ असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे नेते मणीशंकर आय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केले आहे. पंतप्रधान पदावर असणाऱ्या व्यक्तीवर एका जेष्ठ नेत्याने अशा खालच्या शब्दात टीका करणे अशोभनीय आहे. त्यामुळे अय्यर यांच्यावर राजकीय वर्तुळातून जोरदार टीका होत आहे. पंतप्रधान मोदींनीही या टीकेची तातडीने दखल घेतली असून,गुजरातमधील जाहीर सभेतून प्रत्युत्तर दिले. 

या सर्व प्रकारावर राहुल गांधींनी अय्यरांना माफी मागण्यास सांगितले होते. यानंतर मणी शंकर अय्यर माध्यमांशी बोलताना म्हणाले ‘ मी नीच हा शब्दप्रयोग मोदींच्या जातीला उद्देशुन वापरला नव्हता. जर हा जातीवाचक शब्द असेल तर मी माफी मागतो. आणि या सर्व प्रकाराचा एवढा गाजावाजा करण्याची काही गरज नाही मी एक काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता आहे.’

आज सकाळी मोदींनी डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राचे उद्घाटन करताना राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. त्याबाबत अय्यरांना पत्रकारांनी  विचारले असता त्यांनी पंतप्रधांनाबाबत ही वादग्रस्त  टीका केली. मोदींनी राहुल गांधींवर ‘काही लोक डॉ. बाबासाहेबांपेक्षा ‘भोले बाबा’ बाबत बोलत आहेत’ अशी टीका केली होती.

अय्यरांच्या टीकेला पंतप्रधानांनी लगेच उत्तर दिले.  गुजरातमधील जाहीर सभेत ते म्हणाले, ‘हो ते मला नीच म्हणाले. पण, असल्या टीकेला उत्तर देणे  आपल्या संस्कृतीत बसत नाही. आपले उत्तर हे मतपत्रिकेतून मिळेल. त्यांनी मी मुख्यमंत्री असतानाही माझा अपमान केला होता. ते मला ‘मौत का सौदागर’ म्हणाले होते.  

गेल्या कही दिवसांपासून राहूल गांधीच्या काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यातच मणीशंकर आय्यरांच्या मुघल शासकांच्या बाबतीतील वक्तव्य करुन पंतप्रधान मोदींना गुजरात निवडणुकीत आयता मुद्दा दिला होता. त्याचा पुरेपूर वापर मोदींनी केला. आता अय्यर यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे अय्यर काँग्रेससाठी डोकेदुखी ठरत आहेत.