Fri, Jan 24, 2020 16:46होमपेज › National › आपल्या आवडीचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून 'त्याने' कापली जीभ 

आवडीचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून कापली जीभ 

Published On: Dec 06 2018 5:45PM | Last Updated: Dec 06 2018 11:24PM
हैदराबाद : पुढारी ऑनलाईन

पाच राज्यातील विधानसभेचे वातावरण चांगलेच तापले आहे. आपल्या पक्षाची सत्ता यावी यासाठी नेत्यांनी कबर कसली आहे. यामध्ये कार्यकर्तेही मोठ्या आघाडीवरच आहेत. तेलंगणामधील एका कार्यकर्त्याने तर तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये आपल्या आवडीचा मुख्यमंत्री व्हावा यासाठीच देवासमोर चक्क आपली जीभच कापून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तेलंगणा राज्यातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. महेश असे या जीभ कापून घेणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.  इतकेच नाही तर आपल्याला कॅबिनेट मंत्रिपद मिळू दे, असे साकडेही या अवलियाने देवाला घातले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश हा बुधवारी श्रीनगर कॉलोनीमधील व्यंकटेश्वर स्वामी मंदिरामध्ये आला. इथे पूजा केल्यानंतर तो गुडघ्यांवर बसला. त्यानंतर त्याने ब्लेडने आपली जीभ कापून देवासमोर असलेल्या दानपत्रात टाकली. याप्रकारामुळे मंदीरात एकच गोंधळ उडाला. तेथील उपस्थित असलेल्या लोकांनी यासंबंधीची माहिती तत्काळ पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या तरूणाला रुग्णालयात दाखल केले.

या व्यक्तीच्या खिशामधून एक पत्र सापडले आहे. या पत्रात लिहिले होते की, तेलंगणा आणि तामिळनाडू या दोन तेलुगू राज्यांचे मुख्यमंत्री आपल्या आवडीचे व्यक्ती बनावेत, असे मला वाटते. तसेच राजकारणामध्ये मोठे पद मिळावे, अशी माझी अपेक्षा आहे. माझ्या आवडीचे व्यक्ती मुख्यमंत्री झाले तर मला कॅबिनेट मंत्रिपद द्यावे, असा नवस चिठ्ठीमध्ये लिहून त्याने आपली जीभ कापली. दरम्यान, या तरुणाची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.