नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
काही दिवसापूर्वी ब्लू व्हेल या गेमने सगळ्यांना वेड लावले होते. ब्लू व्हेलच्या जाळ्यातून बाहेर पडण्याआधीच तरुणाईला पबजी या ऑनलाईन गेमने पछाडले आहे. तरुणाईला अक्षरक्ष: पबजी या ऑनलाईन गेमने वेड लावले आहे. तरुणाई तासनतास यामध्ये गुंतलेली असते. अशी परिस्थिती असताना एकाने पबजी या ऑनलाईन गेमच्या नादात गरोदर पत्नीस सोडून दिल्याचे समोर आले आहे. यासंबंधीत पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वाचा : मोदींनी चक्क विचारले, 'ये PUBG वाला है क्या'
हा तरुण मलेशियन वंशाचा आहे. व्हायरल फेसबुक पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, पतीला त्याच्या भावांनी पबजी गेमची ओळख करुन दिली होती. यानंतर पतीला पबजी या ऑनलाईन गेमचे वेड लागले. रात्रभर जागूण तो पबजी खेळत होता. त्यामुळे दोघांमध्ये सारखी भांडणे होत होती. या गेममुळेच तो घरच्या जबाबदार्यांकडे दुर्लक्ष करु लागाला होता. पबजीसाठी त्याने कुटुंबास सोडून देण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने घर सोडल्याचे म्हटले आहे. पती घऱ सोडून जाऊन महिना झाल्याचे पत्नीने फेसबुक पोस्टमध्ये सांगितले आहे.
वाचा : ‘पबजी गेम’साठी नवा मोबाईल दिला नाही म्हणून तरुणाची आत्महत्या
काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांसोबत 'परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला होता. यावेळी उपस्थित असलेल्या पालकांच्याकडून मोदी यांना काही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी एका मुलाच्या आईकडून प्रश्न विचारण्यात आला होता की, माझा मुलगा नववीत शिकत आहे, ऑनलाईन गेमच्या वेडापायी तो अभ्यासापासून परावृत्त होत आहे. या प्रश्नावर नरेंद्र मोदी यांनी 'ये पीयुबीजी वाला है क्या ?' (Playerunknown's Battlegrounds) असा प्रतिप्रश्न केला होता. यावरुन त्यांनी चिंत व्यक्त केली होती.
वाचा : ब्ल्यू व्हेल, पोकेमॉननंतर आता ‘पबजी’!
दरम्यान, पीयुबीजी (PUBG) या गेमवर गुजारत येथे बंदी घालण्यात आली आहे. या गेमची निर्मिती २०१७ मध्ये करण्यात आली. या गेमचे भारतासह जगभरात मोठ्याप्रमाणात चाहते आहेत.