होमपेज › National › Lok Sabha Elections Result 2019 : दिग्‍गज नेते देवाच्‍या चरणी

Lok Sabha Elections Result 2019 : दिग्‍गज नेते देवाच्‍या चरणी

Published On: May 23 2019 10:13AM | Last Updated: May 23 2019 10:20AM
नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ वाजल्‍यापासून सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी उमेदवारांच्‍या समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर रात्री जागवल्‍या आहेत. तर सकाळी- सकाळी काही उमेदवारांनी मंदिरात जाऊन पूजा केली. आणि देवाचा आर्शीवाद घेतला. 

भोपाळचे भाजप उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी सूर्य नमस्काराने आपल्‍या दिवसाची सुरुवात केली. निवडणुकीदरम्‍यान, प्रज्ञा ठाकुर गोडसेबद्‍दल वादग्रस्‍त वक्‍तव्‍य केल्‍याने चर्चेत आल्‍या होत्‍या. त्‍या वक्‍तव्‍याचा निषेध करण्‍यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या वक्‍तव्‍याचा निषेध करत टिका केली होती. 

गोरखपुरचे भाजप उमेदवार अभिनेता रविकिशन यांनी  दिवसाची सुरूवात देवाचा आर्शीवाद घेवून केली. तर या निवडण]कीत विजयी होण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली आहे. गोरखपुरमध्ये सातव्या टप्‍प्‍यातील मतदान १९ मे ला झाले होते. याआधी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या जागेवरून निवडणूक लढवली होती.   

कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी मतदानाच्या आधी बेंगलुरूच्या मंदिरात जावून पूजा केली. तर कर्नाटकचे हासन येथील जनता दल सेक्यूलरचे उमेदवार निखिल कुमारस्वामी यांनी म्हैसूरच्या चामुंडेश्वरी मंदिरातील देवीचे दर्शन घेतले. तसेच तेथील देवीची पूजा केली.

केरळ तिरुअनंतपुरमचे भाजपचे उमेदवार के. राजशेखरन यांनी मतमोजणी आधी अय्यागुरु आश्रमातील देवाचा आशीर्वाद घेतला. राजशेखरन हे काँग्रेस नेते शशी थरूर आणि डाव्या डेमोक्रेटिक फ्रंटचे के. सी. दिवाकरन यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात उतरले आहेत. 

काही पक्षाचे समर्थक स्वत: च्या पक्ष जिंकून येण्यासाठी हवन करत आहेत. यामध्ये वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थकांनी सर्वात मोठा यज्ञ केला आहे. तर भोपाळमध्ये काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्या समर्थकांनी देखील पूजा केली.