Fri, Jan 24, 2020 04:53
    ब्रेकिंग    होमपेज › National › दिग्गज काँग्रेसी नेत्यांचा घरचा आहेर; सातत्याने मोदींना 'खलनायक' ठरवू नका!

दिग्गज काँग्रेसी नेत्यांचा घरचा आहेर; सातत्याने मोदींना 'खलनायक' ठरवू नका!

Published On: Aug 23 2019 4:30PM | Last Updated: Aug 23 2019 4:30PM

संग्रहित छायाचित्रनवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सतत खलनायकाच्या भूमिकेत ठेऊन त्यांच्या कार्यपद्धतीवर टिका केल्‍याने व त्यांचे चांगले काम न स्वीकारण्‍याचा काहीच उपयोग होणार नाही, असे मत काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी व्यक्त केले आहे. जयराम रमेश यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला. 

नरेंद्र मोदी यांनी २०१४ ते २०१९ मध्ये जे काम केले त्याचे महत्व समजून घेण्‍याची आवश्‍यकता आहे. त्‍याच्‍या याच कामामुळे त्‍यांना सत्ता मिळाली. तसेच लोकसभा निवडणुकीत भाजपाला ३७.४ टक्के मते मिळाली असून भाजप आणि मित्रपक्षाला एकूण ४५ टक्के मते मिळाली, असे म्‍हणत त्‍यांनी रमेश यांनी काँग्रेसलाच सुनावले. 

कपील सतीश कोमीरेड्डी यांच्या ‘मालेवॉलेंट रिपब्लिक: अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ द न्यू इंडिया’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गुरुवारी दिल्लीमध्ये पार पडला. या सोहळ्यामध्ये जयराम रमेश बोलत होते. याववेळी जयराम रमेश म्‍हणाले की, मोदी लोकांशी अशा पद्धतीने संवाद साधतात की जास्तीत- जास्त लोक त्यांच्याशी थेट जोडले जातात. मोदींच्या कामांचे जनतेकडून कौतुक होत आहे. अनेक कामे मोदींनीच पहिल्यांदा करुन दाखवली आहेत हे जोपर्यंत आपण मान्य करत नाही तोपर्यंत आपण त्यांचा सामना करु शकत नाही.

मोदी यांना कायम खलनायकाच्‍या भू्मिकेत दाखवल्‍याने काहीच फायदा होणार नाही, असा टोला जयराम रमेश यांनी स्वत:च्या पक्षाला दिला. जर तुम्ही कायमच मोदींना खलनायक असल्याचे म्हणत असाल तर तुम्ही त्यांचा सामना करु शकत नाही हे लक्षात घ्यायला हवे असे मत रमेश यांनी व्यक्त केले. तसेच राजकारणातील लोकांनी मोदींनी प्रशासन आणि अर्थिक स्तरावर केलेल्या बदलांचा स्वीकार करावा अशी आशा देखील व्‍यक्‍त केली. 

२०१९ मध्ये राजकीय टीका करताना आम्ही मोदींच्या एक दोन योजनांची खिल्‍ली उडवली. मात्र सर्वच निवडणूक प्रचारामध्ये त्यांच्या उ्‍जज्वला योजनेमुळेच ते थेट करोडो महिलांशी जोडले गेले. यामुळे २०१४ साली त्यांच्याकडे असणाऱ्या राजकीय पाठिंब्यापेक्षा अधिक पाठिंबा मिळाला. आम्ही आमच्या निवडणूक प्रचारामध्ये शेतकऱ्यांच्या परिस्थितीबद्दलचा मुद्दा उपस्थित केला. लोकांना तो पटलाही. त्यांनाही शेतकऱ्यांच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली मात्र त्यासाठी त्यांनी मोदींना दोषी ठरवले नाही. त्याचाच परिणाम निकालांमध्ये दिसून आला. त्यामुळेच मोदी सर्वांन इतके आपलेसे का वाटतात याचा आपण विचार करायला हवा, असे मत रमेश यांनी व्यक्त केले.

रमेश यांनी मोदींची स्तुती करण्यासाठी आपण हे मत व्यक्त करत नसल्याचे स्पष्ट केले. काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनीही जयराम रमेश यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. मोदींना सातत्याने खलनायक म्हणून पाहणे योग्य नसल्याचे सिंघवी म्हणाले. देशाचे पंतप्रधान म्हणून असे करणे यासाठी नव्हे, तर त्यामुळे एकप्रकारे आपण (विरोधी पक्ष) त्यांना मदत करत आहोत. सिंघवी म्हणाले, की काम नेहमीच चांगले, वाईट आणि सामान्य असते. त्यामुळे कामाचे मुल्यांकन व्यक्तीवर न होता मुद्यांवर आधारित असायला हवे. उज्वला योजना ही त्यापैकीच एक आहे.  दिग्गज काँग्रेसी नेत्यांचा घरचा आहेर; सातत्याने मोदींना 'खलनायक' ठरवू नका!