Sat, Jul 04, 2020 11:22होमपेज › National › गलवान खोर्‍यात आता भारताचे ‘भीष्म’ तैनात!

गलवान खोर्‍यात आता भारताचे ‘भीष्म’ तैनात!

Last Updated: Jun 30 2020 10:58PM
नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पूर्व लडाखमध्ये एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत असलेली स्थिती कायम करण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे; पण त्याचवेळी चीनने कुठलीही आगळीक केली, तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठीही तत्पर आहे. या तत्परतेचाच एक भाग म्हणून भारतीय लष्कराने गलवान खोर्‍यात 14 हजार फूट उंचावर 6 टी-90 ‘भीष्म’ रणगाडे तैनात केले आहेत. हे रणगाडे क्षेपणास्त्र डागण्यातही सक्षम आहेत, हे महत्त्वाचे!

गलवान खोर्‍यात गलवान नदीच्या काठालगत चीनने सैन्याची जमवाजमव केलेली आहे. शस्त्रास्त्रांच्या द़ृष्टीनेही चीन या भागात सज्ज आहे. ही बाब लक्षात घेऊनच भारतीय लष्कराने पहिल्यांदाच इतक्या उंचावरील भागात हे रणगाडे पोहोचविण्याचा निर्णय घेतला.  पूर्व लडाखमध्ये चीनला लागून असलेल्या 1 हजार 597 किलोमीटरच्या नियंत्रण रेषेजवळ भारतीय सैन्याने युद्ध वाहनांसह 155 एमएम हॉवित्झर तोफाही सज्ज ठेवल्या आहेत.