होमपेज › National › देशात दोन वर्षांत 237 वाघांचा मृत्यू

देशात दोन वर्षांत 237 वाघांचा मृत्यू

Published On: Aug 11 2018 1:24AM | Last Updated: Aug 11 2018 12:31AMनवी दिल्ली : वृत्तसंस्था

गत दोन वर्षांत 237 वाघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पर्यावरण राज्यमंत्री महेश शर्मा यांनी शुक्रवारी लोकसभेत लेखी उत्तरादाखल दिली. 

वर्ष 2012 ते 2017 या कालावधीत वाघांचे जे मृत्यू झाले, त्यातील 23 टक्के मृत्यू शिकारीमुळे झाल्याचे सांगून शर्मा उत्तरात पुढे म्हणतात की, शिकारीचे प्रमाण लक्षणीय असले, तरी वाघांची संख्या वर्षागणिक वाढत आहे. वर्ष 2016 मध्ये 122 तर 2017 मध्ये 115 वाघांचा मृत्यू झाला.