Mon, Sep 16, 2019 03:44होमपेज › National › भारतीय हद्दीत घुसले ४ दहशतवादी

भारतीय हद्दीत घुसले ४ दहशतवादी

Published On: Aug 20 2019 8:23AM | Last Updated: Aug 20 2019 11:45AM

file photoजयपूर : पुढारी ऑनलाईन

पाकिस्तानची गुप्तचर संस्था 'इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स'च्या (आयएसआय) एजंट बरोबर चार दहशतवादी भारतात घुसल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीच्या आधारावर राजस्थान आणि गुजरात सीमेसह संपूर्ण देशभरात हाय अलर्ट जारी केला आहे. हे लोक अफगाणिस्तानी पासपोर्टच्या माध्यमातून देशात दाखल झाल्याची माहिती पुढे आली आहे. 

राजस्थानमधील सिरोही येथील पोलिस अधीक्षक कल्याणम मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार लोकांच्या गटाने आयएसआय एजंट बरोबर देशाच्या सीमेत प्रवेश केला आहे. ते कोणत्याही क्षणी दहशतवादी घातपात घडवू शकतात. याबाबतचे एक पत्र जिल्ह्यातील सर्व पोलिस स्थानकांना पाठविण्यात आले आहे.

या पत्रानंतर पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. गर्दीची ठिकाणे, हॉटेल्स, ढाबे, रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकांवर तपास करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. तसेच संशयित वाहनांच्या हालचालीवर नजर ठेवली जात आहे. संशयित व्यक्तींची चौकशी करावी, असेही निर्देश दिले आहेत.