Sun, Nov 18, 2018 18:36होमपेज › National › हार्दिकचे आणखी ५ व्हिडिओ व्हायरल

हार्दिकचे आणखी ५ व्हिडिओ व्हायरल

Published On: Dec 07 2017 1:42PM | Last Updated: Dec 07 2017 1:42PM

बुकमार्क करा

अहमदाबाद : पुढारी ऑनलाईन

पाटीदार अनामत समितीचा नेता हार्दिक पटेल पुन्हा अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. गेल्या महिन्यात हार्दिकचे कथित दोन अश्लिल व्हिडिओ समोर आल्‍याची घटना ताजी असतानाच त्‍याचे आणखी पाच कथित व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे व्हिडिओ समोर आल्‍याने हार्दिकची डोकेदुखी वाढणार आहे. 

गुजरात निवडणुकीत काँग्रेसला मिळत असलेला पाठिंबा आणि भाजपच्या प्रचार सभांचा तडाखा, यामुळे निवडणुकीला चांगलाच भर चढत असताना हार्दिकच्या या व्हिडिओमुळे काँग्रेसचीही गोची होण्याची शक्‍यता आहे. याआधी हार्दिकचे दोन व्हिडिओ समोर आले होते. त्‍यामध्ये तो त्‍याच्या मित्र-मैत्रिणींसह हॉटेलच्या एका खोलीत दारू पिताना दिसत आहे. तर, आता व्हायरल झालेल्‍या या व्हिडिओमध्येही हार्दिक त्याच्या मैत्रिणीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत आहे. हे व्हिडिओ २९ मे रोजी रेकॉर्ड करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

दरम्‍यान, हे व्हिडिओ बनावट असून, हार्दिकला बदनाम करण्यासाठी भाजपने रचलेले हे कारस्थान असल्याचा आरोप, पाटीदार नेत्यांनी केला आहे.