Tue, Jan 22, 2019 07:35होमपेज › National › फुटबॉल महासंघाने दिल्या रशियन तरुणींना पटवण्याच्या टिप्स!

फुटबॉल महासंघाने दिल्या रशियन तरुणींना पटवण्याच्या टिप्स!

Published On: May 17 2018 6:46PM | Last Updated: May 17 2018 6:47PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

एखादा देश आपल्या नागरिकांसाठी दुसऱ्या देशात जाताना घ्यावयाच्या काळजी संदर्भात नियम पुस्तिका (मॅन्युअल) जाहीर करत असतो. यात त्या देशात काय करावे आणि काय करू नये याबाबतच्या सूचना असतात. अशा  नियम पुस्तिकेमध्ये कधी संबंधित देशातील तरुणींना कसे पटवायचे याबाबतच्या सूचना दिल्या तर काय होईल. थोड विचित्र असले तरी एका देशाने हा प्रताप केला आहे. 

रशियामध्ये पुढील महिन्यात फिफा वर्ल्डकप होणार आहे. यासाठी फुटबॉल संघ आणि चाहतेही जोरदार तयारी करताना दिसत आहेत. अनेक खेळाडू खेळातले डावपेच शिकत आहेत. या तयारी दरम्यान अर्जेंटिनामधील फुटबॉल असोशिएशनचे एक मॅन्युअल चर्चेत आले आहे आणि चर्चेत येण्याचे कारण म्हणजे यातील वादग्रस्त सल्ले होय. 

असोशिएशनने मॅन्युअलमध्ये खेळाडू, पत्रकार आणि अधिकाऱ्यांना रशियन तरूणींना कसे पटवण्याचे याचे धडे दिले आहेत. मॅन्युअलमध्ये रशियन तरूणींना म्प्रेस करण्याच्या टिप्स दिल्या आहेत. ऐवढ्यावरच न थांबता यात तरूणींना किस कसे करायचे यावर एक अख्खा धडाच देण्यात आला आहे. 

असोशिएशनचा हा कारभार उघड झाल्यानंतर अनेकांनी त्यावर नाराजी व्यक्त करत निषेध केला. यानंतर हे मॅन्युअल मागे घेण्यात आले. अनेक अधिकाऱ्यांनी रशियन तरूणींसदर्भातील चॅप्टर फाडून टाकले. असोशिएशने या प्रकाराची माफी मागत चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, एका पत्रकाराच्या हाती हे मॅन्युअल लागले आणि त्याने त्याचे फोटो ट्विटवर शेअर केले. या पत्रकाचे शिर्षक होते, ‘रशियन तरुणींना पटवण्यासाठी काय कराल’

 

No automatic alt text available.

काय म्हटले आहे मॅन्युअलमध्ये 

रशियन तरूणींना स्वच्छ नीटनेटके राहणारे तरूण आवडतात. छान सुगंधी परर्फ्युम वापरणारे आणि ड्रेसिंग स्टाईल चांगली असणाऱ्या तरूणांना त्या पसंती देतात. रशियन तरूणींना बोरींग पुरूष आवडत नाहीत. त्यांना सतत बोलणारे, शांत न बसणारे पुरूष आवडतात. देश, संस्कृती आणि अनेक मजेदार गोष्टी तरूणांनी शेअर कराव्यात अशी त्यांची अपेक्षा असते, असे उपदेश या मॅन्युअलमधून खेळाडूंना सांगण्यात आले होते. 

रशियन तरूणींच्या सुंदरतेमुळे अनेकजण त्यांच्यासोबत शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात. त्या तरूणींनाही हेच अपेक्षीत असेल. पण, त्यांची इच्छा असते की समोरच्या व्यक्तीने त्यांना स्पेशल आणि खास वागणूक द्यावी. 

मॅन्युअल पुढे म्हटले होते की, रशियन तरुणींना शारीरिक संबंधांविषयी काहीही उलट-सुलट प्रश्न विचारू नका. रशियन लोकांसाठी सेक्स हा खूपच खाजगी मुद्दा असतो. त्यामुळे ते लोक यावर उघडपणे चर्चा करत नाहीत. तरूणींना चुकीच्या पद्धतीने इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करू नका. तसेच, मुलांनी प्रथम बोलण्याची सुरूवात करावी अशी रशियन मुलींची इच्छा असते.