Tue, May 26, 2020 18:37



होमपेज › National › ‘कर्तारपूर कॉरिडॉरमुळे भारत-पाक संबंध सुधारतील’

‘कर्तारपूर कॉरिडॉरमुळे भारत-पाक संबंध सुधारतील’

Last Updated: Nov 09 2019 8:29PM

संग्रहित फोटो



कर्तारपूर : पुढारी ऑनलाईन  

पाकिस्तानमधील गुरुद्वारा दरबार साहिब यांच्या दर्शनासाठी भारत आणि पाकिस्तानमध्ये कर्तारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन केले गेले आहे. याप्रसंगी, ही चांगली सुरुवात होती. भारत-पाकिस्तान संबंधात बरेच किंतु-परंतु आहेत पण मला आशा आहे की दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी ही चांगली सुरुवात आहे, असे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे. भारताच्या हद्दीत असणाऱ्या कॉरिडॉरचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. 

 

कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेतली. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग देखील उपस्थित होते. पाकिस्तानमधील गुरुद्वारा दरबार साहिबला भेट देणाऱ्या पहिल्या तुकडीत हे दोन्ही नेते सामील झाले होते. 

कर्तारपूर दोन्ही देशांमधील कॉरिडॉर बनेल : कॅप्टन

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले, हा एक चांगला अनुभव होता. मला आशा आहे की, हा कॉरिडॉर हळूहळू दोन्ही देशांमधील चांगल्या मैत्रीचा कॉरिडॉर होईल. तसेच हा कॉरिडॉर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील नरोवाल जिल्ह्यामधील कर्तारपूरस्थित दरबार साहिब डेरा बाबा नानक गुरुद्वाराला जोडला जाईल. 

पाकिस्तानमधील गुरुद्वारा दरबार साहिबला भेट देणाऱ्या पहिल्या तुकडीतून गेलेले सर्व लोक परत आले आहेत. यामध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, बॉलिवूड अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओल, माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवजोत सिंह, अकाल तख्तचे जत्थेदार हरप्रीत सिंह, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह, माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, सुखबीरसिंग बादल आणि केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांचा समावेश आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केल्यानंतर ५०० भारतीय शीख यात्रेकरूंची पहिली तुकडी पाठविली होती. ही पहिली तुकडी कर्तारपूर कॉरिडॉरमार्गे पाकिस्तानमध्ये गेली होती.