Tue, Jan 22, 2019 08:30होमपेज › National › चोकसीच्या सहकाऱ्याला १२ नोव्हेंबर पर्यंत कोठडी

चोकसीच्या सहकाऱ्याला १२ नोव्हेंबर पर्यंत कोठडी

Published On: Nov 08 2018 10:08PM | Last Updated: Nov 08 2018 9:58PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

मेहुल चोकसीच्या सहकारी दीपक कुलकर्णी याला ५ नोव्हेबर रोजी कोलकता येथील विमानतळावर अटक करण्यात आली होती. कुलकर्णी याला १२ नोव्हेबर पर्यंत कोर्टाने ईडीची कोठडी सुनावली आहे. 

मेहुल चोकसी हा पंजाब नॅशनल बँकेच्या १४ हजार कोटींच्या कर्ज घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहे. हाँगकाँग वरुन परत येणाऱ्या चोकसीचा सहकारी दीपक कुलकर्णी याला काेलकाता विमानतळावरुन अटक केली होती. सीबीआय आणि ईडी यांच्या कडून ही कारवाई करण्यात आली होती.