Mon, Jun 17, 2019 10:03होमपेज › National › सप,बसप हवं ते करण्यास मोकळे : राहुल गांधी 

सप,बसप हवं ते करण्यास मोकळे : राहुल गांधी 

Published On: Jan 12 2019 10:59PM | Last Updated: Jan 12 2019 11:13PM
दुबई : पुढारी ऑनलाईन 

समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी करत असल्याचे जाहीर केले. सप, बसपने फक्त आघाडीची घोषणा केली नाही तर त्यांनी जागावाटपही करुन टाकले. त्यांनी ८० जागांपैकी प्रत्येकी ३८ जागा वाटून घेतल्या.  या सर्व प्रक्रियेत महाआघाडीची स्वप्ने बघणारी काँग्रेस बघ्याच्याच भूमिकेत राहिली. अखेर या प्रकरणावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सप,बसप  त्याना हव ते करण्यास मोकळे असल्याचे सांगितले. 

सप, बसपने उत्तर प्रदेशात आघाडी करत ५०-५० फॉर्म्युला अमलात आणला. बसप प्रमुख मायावती आणि सप प्रमुख अखिलेश यादव यांनी पत्रकार परिषद घेत याची घोषणा देखील केली. तसेच अमेठी आणि रायबरेली या काँग्रेसच्या हक्काच्या जागा सोडून उपकार करत असल्याचा आविर्भावही आणला.  या घोषणेनंतर काँग्रेसच्या काही नेत्यांनी उत्तर प्रदेशात स्बळावर लढण्याचे संकेत दिले होते. आता खुद्द राहुल गांधींनी असेच संकेत दुबईतून दिले.

दुबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी ‘सप आणि बसप यांना कोणताही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. मला या बसप आणि सप नेत्यांविषयी प्रचंड आदर आहे. काँग्रेस पक्षाकडे उत्तर प्रदेशच्या जनतेला देण्यासारखे बरेच काही आहे.’

बसप आणि सप यांच्या या निर्णयाबद्दल बोलताना राहुल गांधी पुढे म्हणाले ‘सप आणि बसपने राजकीय निर्णय घेतला आहे. आता उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्ष कसा मजबूत करायचा हे आमच्यावर आहे. आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने लढेल.’

राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेवरुन काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशात स्वबळावर लढवण्याचे संकेत मिळत आहेत. सप आणि बसप यांची ही आघाडी भाजपसह काँग्रेसलाही डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.