Sat, Apr 20, 2019 15:50होमपेज › National › ममता आणि अमित शहांच्या 'शाब्दिक' युद्धानंतर आता 'पोस्टरबाजी'ने बंगाल तापला..!

ममता आणि अमित शहांच्या 'शाब्दिक' युद्धानंतर आता 'पोस्टरबाजी'ने बंगाल तापला..!

Published On: Aug 11 2018 11:13AM | Last Updated: Aug 11 2018 11:13AMकोलकाता : पुढारी ऑनलाईन

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना खिंडीत पकडण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी चांगलीच कंबर कसली आहे. त्याला आगामी लोकसभेतील निवडणुकीची झालर सुद्धा आहे. त्या पार्श्वभूमीवर आज बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा गड असलेल्या कोलकातामध्ये भाजप अध्यक्ष अमित शहांची तोफ धडाडणार आहे.

आज होत असलेल्या रॅलीला परवानगी देण्यापासूनच वातावरण तापले. कोलकातामध्ये अमित शहांच्या रॅलीच्या अगोदर तृणमुल काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या पोस्टरबाजीने अधिकच भर पडली आहे.  बंगाल विरोधी भाजप परत जा अशा आशयाचे पोस्टर दिसून येत आहेत. भाजपने केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह व बंगालच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून रॅलीच्या सुरक्षेची काळजी घेण्याची विनंती केली आहे. 

राष्ट्रीय नागरिक नोंदणीविरोधात तृणमुल काँग्रेसकडूनही आज रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तृणमुलकडून कोलकाताला रॅलीमधून वगळण्यात आलय. ममतांना बंगालमध्ये घेरण्यासाठी भाजप राष्ट्रीय पातळीवरील नेतेही आघाडीवर आहेत. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षा पुनम महाजन यांनी राष्ट्रीय नागरिक नोंदणीवरून ममतांवर टीका केली. राष्ट्रीय नागरिक नोंदणीवर ममता दीदी २०० ५ मध्ये एक बोलतात, नंतर २०१८ मध्ये वेगळचं काही बोलतात, या यु टर्नमुळेच व बंगालमधील युवकासाठी रॅली करत असल्याची टीका पुनम यांनी केली.  भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांनीसुद्धा ट्विटरवरून ममता यांच्यावर टीका करत अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला.