Fri, Oct 20, 2017 08:33



होमपेज › National › आरुषी हत्‍या : तलवार दाम्‍पत्‍याची अलाहाबाद हायकोर्टाकडून सुटका 

आरुषी हत्‍या : तलवार दाम्‍पत्‍याची अलाहाबाद हायकोर्टाकडून सुटका 

Published On: Oct 12 2017 3:23PM | Last Updated: Oct 12 2017 3:23PM

बुकमार्क करा





अलाहाबाद : पुढारी ऑनलाईन 

बहुचर्चित आरुषी तलवार आणि हेमराज हत्‍या प्रकरणात तुरुंगात असलेल्‍या आरुषीचे आई-वडिल यांची सुटका करण्‍यात आली. सबळ पुराव्‍यांअभावी राजेश तलवार आणि नुपूर तलवार यांची अलाहाबाद हायकोर्टाने सुटका केली आहे. 

सन २००८ मध्ये नोएडामध्ये आरूषी तलवार आणि हेमराज यांची हत्या करण्‍यात आली होती. या प्रकरणात आरुषीचे आई-वडिल राजेश तलवार आणि नुपूर तलवार यांना दोषी ठरवण्‍यात आले होते. आरुषी हत्‍याकांड प्रकरणात तलवार दाम्‍पत्‍यांना जन्‍मठेपेची शिक्षाही झाली होती. मात्र, सीबीआय न्‍यायालयाने दिलेल्‍या निर्णयाविरोधात राजेश आणि नुपूर तलवार यांनी अलाहाबाद हायकोर्टात अपील केले होते. 
 

काय आहे प्रकरण-

मे २००८ मध्ये नोएडातील जलवायू विहार परिसरात १४ वर्षांच्या आरूषीचा मृतदेह घरात आढळून आला होता. धारधार शस्त्रांनी तिचा गळा चिरण्यात आला होता. सुरूवातीला हेमराजवर संशय होता. पण, दोन दिवसानंतर घराच्या गच्चीवर त्याचाही मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

देशभरातील माध्यमांमध्ये चर्चिल्या गेलेल्या या प्रकरणामुळे उत्तर प्रदेश पोलिसांवर मोठा दबाव आला होता. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले होते. या प्रकरणाचा तपासही सीबीआयच्या दोन पथकांनी केला होता.