Wed, Feb 20, 2019 15:23होमपेज › National › कर्नाटकच सरकार ठरलं! म्हणे येडियुरप्पा उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

कर्नाटकच सरकार ठरलं! म्हणे येडियुरप्पा उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

Published On: May 16 2018 9:23PM | Last Updated: May 16 2018 9:34PM बंगळुरु : पुढारी ऑनलाईन

कर्नाटकमध्ये सत्तास्थापनेची समीकरण भाजपच सोडवण्याची चिन्हे आहेत. भाजप नेता सुरेश कुमार यांनी ट्विटच्या माध्यमातून राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिल्याचे ट्विट केले आहे. उद्या म्हणजेच गुरुवारी ९ वाजून ३० मिनिटांनी येडियुरप्पा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपच्या शिष्टमंडळाने सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसच्या शिष्टमंडळानेही राज्यपालांची भेट घेतली होती. तसेच बहुमताचा दावा करत सरकार स्थापनेचा दावा केला होता. काँग्रेस आणि जेडीएसने राज्यपालांकडे समर्थक आमदारांची यादीही सुपूर्द केली होती. त्यानंतर कायद्यानुसार या बाबत निर्णय घेतला जाईल असे राज्यपाल वजुभाई वाला यांनी स्पष्ट केले होते.

भाजप आमदाराच्या दाव्यानुसार, राज्यपाल वजुभाई यांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी बोलवले आहे. गुरुवारी येडियुरप्पा शपथ घेणार असून राजभवनातून तसे संकेत मिळाल्याचं भाजपच्या सूत्रांनी म्हटले आहे. भाजपच्या दाव्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसनेही मोर्चेबांधणी सुरू केली असून आमदार फुटू नये, याची खबरदारी ते घेत आहेत. भाजपचा दावा खरा ठरणार की कर्नाटक राज्यात नवे ट्विस्ट निर्माण होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. भाजप आमदाराच्या ट्विटनुसार येडियुरप्पांनी शपथ घेतली तर भाजप सरकार संख्याबळ सिद्ध करण्यासाठी समर्थ ठरणार का ?  हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.