Sat, Sep 21, 2019 06:16होमपेज › National › 'बंगालमध्ये टीएमसी करु शकते नरसंहार'

'बंगालमध्ये टीएमसी करु शकते नरसंहार'

Published On: May 19 2019 4:00PM | Last Updated: May 19 2019 4:00PM
नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपून मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात आले, तरी पश्चिम बंगालमधील निवडणुकीचे राजकारण चांगलच तापलेल पाहायला मिळाले. बंगालमध्ये अखेरच्या टप्प्यातही भाजप आणि तृणमुलमध्ये धमकीसत्र, उत्तर कोलकात्यामध्ये बुथवर बॉम्ब फेकले. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी पश्चिम बंगालमधील या घडामोडींवर भाष्य करताना चिंता व्यक्त केली.

माध्यमांशी बोलताना सीतारामन, तृणमुलचे कार्यकर्ते मतदारांना घाबरवत आहेत. त्यामुळे बंगालमधील मतदान संपल्यानंतर टीएमसीद्वारे नरसंहार होण्याची भिती त्यांनी व्यक्त केली. तसेच निवडणुकीची आदर्श आचारसंहिता संपेपर्यंत केंद्रीय सुरक्षा दल पश्चिम बंगालमध्ये तैनात ठेवावे अशी मागणीही निर्मला सीतारामन यांनी केली आहे.

टीएमसीच्या हिंसाचाराविरोधात भाजपा पुन्हा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे असंही निर्मला सीतारामन यांनी सांगितले.