Sun, Jan 19, 2020 00:08होमपेज › National › चीन सीमेनजीक जवानांचा युद्धसराव

चीन सीमेनजीक जवानांचा युद्धसराव

Published On: Sep 12 2019 1:44AM | Last Updated: Sep 11 2019 11:13PM
नवी दिल्ली : वृत्तसंस्था

चीन सीमेनजीक ऑक्टोबर महिन्यात पाच हजार जवान युद्धसराव करणार आहेत. अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या सीमेजवळ लष्कर आणि हवाई दलातर्फे प्रथमच संयुक्‍त सराव करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

संरक्षण दलातील जवानांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी केली होती. त्या अनुषंगाने लष्कर आणि हवाई दलातील सुमारे पाच हजार जणांची युद्धसरावाची निवड करण्यात आली आहे. या लष्करी सरावानंतर जवानांना देशातील सीमेवर तैनात करण्यात येणार आहे. विविध तुकड्यांमधून जवानांची निवड करण्यात आली आहे. या युद्धसरावातून लढाऊ तुकडी तयार करण्यात येणार आहे. युनिक इंडिग्रेटेड बॅटल ग्रुप्समध्ये प्रशिक्षित जवानांची निवड करण्यात येणार आहे. इन्फंट्री, रणगाडे, तोफगोळे, सिग्‍नल आणि इंजिनिअर्स विभागातील जवानांचा यामध्ये समावेश करण्यात येणार आहे. युद्धाच्या प्रसंगी ही लढाऊ तुकडी आघाडीवर असेल, शत्रूंच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्याचे काम या लढाऊ रेजिमेंटवर असणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.