Mon, Nov 20, 2017 17:24होमपेज › National › हार्दिक पटेल कथित सेक्स सीडी प्रकरण; आणखी 4 क्लिप व्हायरल

22 वर्षातील विकासाची सीडी दाखवा: हार्दिक पटेल

Published On: Nov 15 2017 12:30PM | Last Updated: Nov 15 2017 12:29PM

बुकमार्क करा

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

कथित सेक्स सीडीमुळे चर्चेत आलेला पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांच्या पाठिंब्यासाठी अनेक नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. सेक्स हा मूलभूत अधिकार असल्याचे सांगत जिग्नेश मेवानी यांनी हार्दिकला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, बुधवारी हार्दिकच्या आणखी चार व्हिडिओ क्लिप समोर आल्या आहेत. गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण समोर आल्याने हार्दिकच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

गुजरातमधील दलित नेते जिग्नेश मेवानी यांनी याप्रकरणी हार्दिकला पाठिंबा दिला आहे. सेक्स सीडी प्रकरण म्हणजे पटेल यांच्या वैयक्तीक आयुष्यात डोकावल्याचा प्रकार असल्याचे मेवानी यांनी म्हटले आहे. 

हार्दिकचे उत्तर...

सीडी प्रकरणावर हार्दिक पटेल याने देखील ट्विटवर उत्तर दिले आहे. गुजरातच्या जनतेला 22 वर्षाच्या मुलाची नव्हे तर 22 वर्षात झालेल्या विकासाची सीडी पाहायची असल्याचे हार्दिकने म्हटले आहे.