Sun, Sep 23, 2018 13:30होमपेज › National › उच्च जातीतील पुजारी खालच्या जातीतील सदस्यांना पुजेपासून रोखू शकत नाहीत 

उच्च जातीतील पुजारी खालच्या जातीतील सदस्यांना पुजेपासून रोखू शकत नाहीत 

Published On: Jul 12 2018 5:59PM | Last Updated: Jul 12 2018 5:59PMडेहराडून : पुढारी ऑनलाईन 

वरच्या जातीतील पुजारी खालच्या जातीतील पुजाऱ्यांना धार्मिक विधी करण्यापासून रोखू शकत नाही, असा महत्वपूर्ण आदेश उत्तराखंड उच्च न्यायालयाने दिला आहे. अनुसुचित जाती व जमातीतील सदस्यांच्या अनुपस्थितीत कोणतेही धार्मिक विधी करण्यापासून उच्च जातीतील पुजारी रोखू शकत नाही असे न्यायालयाने नमूद केले.

उत्तराखंड राज्यामध्ये कोणत्याही धार्मिकस्थळ व मंदीरामध्ये धार्मिक कार्यक्रमापासून खालच्या जातीतील सदस्यांना  रोखू शकत नसल्याचे विभागीय खंडपीठाचे न्यायमूर्ती राजीव शर्मा व न्यायमूर्ती लोक पाल सिंह यानी सांगितले. सर्वच जातीतील लोकांना कोणत्याही मंदिरामध्ये जाण्यास भेदभाव करता येणार नाही, ते  निःसंकोचपणे जाऊ शकतात असे खंडपीठाने नमूद केले.

 त्याचबरोबर उच्च जातीतील पुजारी जर मंदिरामध्ये धार्मिक विधी करत असतील तर त्यांच्यावर कोणतीही बंदी नसल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले. जातीचा विचार न करता उचित प्रशिक्षण घेतलेल्यांना पुजाऱ्यांची मंदिरात नेमणुक करता येईल असेही न्यायालयाने सांगितले. न्यायालयाने २०१६ मध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना वरील आदेश दिला.