Sun, Feb 24, 2019 03:36होमपेज › National › प्राध्यापकाच्या बदलीसाठी केला टॉस!

प्राध्यापकाच्या बदलीसाठी केला टॉस!

Published On: Feb 14 2018 8:48AM | Last Updated: Feb 14 2018 11:56AMचंदीगढ : वृत्तसंस्था

प्राध्यापक, शिक्षक आणि एकूणच सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या हा सातत्याने चर्चेचाविषय असतो. या बदल्यांच्या मागे दडलेला 'अर्थ' अनेकदा चव्हाट्यावर आलेला पहायला मिळतो. पण, एका प्राध्यापकाच्या बदलीसाठी टॉस करावा लागल्याची घटना दुर्मिळच म्हणावी लागेल. अशी घटना पंजाबमध्ये घडली आहे. 

पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधील प्राध्यापकाच्या बदलीसाठी पंजाबमधील एका मंत्र्याने चक्‍क नाणेफेकीचा आधार घेतला. पतियाळा येथील सरकारी पॉलिटेक्निकमधील बदलीसाठी दोन प्राध्यापक उत्सुक होते. प्रकरण थेट तंत्रशिक्षणमंत्री चरणजितसिंग चानी यांच्यापर्यंत गेले. त्यांनी आपापसातच काय ते ठरवा, असे सांगितले. मात्र, या दोघांनी निर्णय चरणजितसिंग यांनीच घ्यावा, असा आग्रह धरला. अखेर मंत्र्यांनी थेट नाणेफेक करूनच निर्णय दिला. वृत्तवाहिन्यांवरदेखील हा प्रकार दाखवण्यात आला. काँग्रेस सरकारने चरणजितसिंग यांनी घेतलेल्या या निर्णयाचे समर्थन केले असून, ‘पारदर्शकतेने’ प्रश्‍न सुटावा म्हणून त्यांनी नाणेफेक केल्याचे म्हटले आहे.