Mon, Nov 20, 2017 17:24होमपेज › National › दिल्ली भारताची राजधानी नाही : आप

'कोण म्हणतंय दिल्ली देशाची राजधानी?'

Published On: Nov 15 2017 10:01AM | Last Updated: Nov 15 2017 10:08AM

बुकमार्क करा

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने सर्वोच्च न्यायालयाला एक अजब प्रश्न विचारून कोड्यात टाकले आहे. भारतीय घटनेत अथवा संसदेने मंजूर केलेल्या अन्य कोणत्याही कायद्यात दिल्ली देशाची राजधानी आहे असे म्हटले आहे का? असा प्रश्न ‘आप’ने विचारला आहे. 

मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर दिल्ली सरकारची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी सांगितले की, ‘भारतीय घटनेत अथवा अन्य कोणत्याही कायद्यात दिल्ली भारताची राजाधानी असल्याचा उल्लेख नाही.’

देशाची राजधानी संदर्भात कोणताही कायदा अस्तित्वात नाही. उद्या केंद्र सरकार राजधानी अन्य कोणत्याही शहरात हलवू शकते. भारतीय घटनेत देखील दिल्ली भारताची राजधानी दिल्ली असल्याचा उल्लेख नाही. आम्हाला माहित आहे की इंग्रजांनी राजधानी कोलकात्याहून दिल्लीला आणली. सध्या नॅशनल कॅपीटल टेरटेरी ऑफ दिल्ली(एनसीटी) हा कायद्या अस्तित्वात आहे. मात्र त्यात देखील दिल्ली भारताची राजधानी असल्याचा उल्लेख नसल्याचे जयसिंह यांनी खंडपीठासमोर सांगितले. जयसिंह यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर खंडपीठाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

दिल्लीत आपचे सरकार आल्यापासून अधिकारांच्या मुद्द्यावर केंद्र सरकारसोबत वाद सुरु आहेत. हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. यावादावर याआधी झालेल्या सुनावणी दरम्यान दिल्लीत नायब राज्यपालच बॉस असतील असा निर्णय न्यायालयाने दिला होता. 

दिल्ली सरकारची बाजू मांडताना जयसिंह म्हणाल्या, ‘एनसीटीच्या बाबत निर्णय घेण्यासाठी दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार दोन संस्था आहेत. दिल्ली एक राज्य आहे असा माझा दावा नाही. मात्र येथे विधानसभा अस्तित्वात आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ आहे. मात्र इतर राज्यांचे सरकार आणि केंद्र सरकार यांना काही स्वतंत्र अधिकार दिले आहेत. तश्याच प्रकारची उपाय योजना दिल्लीसाठी देखील केली पाहिजे.’