Mon, Jan 22, 2018 03:50होमपेज › National › रोजगार निर्मितीत टीसीएसचाही आखडता हात 

रोजगार निर्मितीत टीसीएसचाही आखडता हात 

Published On: Jan 13 2018 9:00AM | Last Updated: Jan 13 2018 9:00AM

बुकमार्क करा

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

भारतातील आयटी क्षेत्रातील नामवंत कंपनी टीसीएसने देखील नवीन रोजगार देण्याबाबत आपला हात आखडता घेतला आहे. गेल्या काही काळापासून भारतातील प्रमुख आयटी कंपन्यांनी नवीन कर्मचारी भरतीला कात्री लावली आहे. यात कॉगनिझंट, इन्फोसिस, टेक महिंद्रा, विप्रो यासारख्या नावाजलेल्या कंपन्यांचा समावेश होता. त्यात आता टीसीएसची भर पडली आहे.

टीसीएसने यंदाच्या आर्थिक वर्षात गेल्या नऊ महिन्यात फक्त ३,६५७ नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. मागच्या आर्थिक वर्षात हीच नवीन कर्मचारी भारती २४,६५४ इतकी होती. भारतातील आयटी कंपन्या या राजगार निर्मितीतील सर्वात मोठा वाटा उचलत होत्या. आता त्यांनीच आखडता हात घेतल्याने आयटी क्षेत्रावर बेरोजगारीची टांगती तलवार असणार आहे.

याबाबत टीसीएसचे ग्लोबल एच. आर. हेड अजोय मुखर्जी म्हणाले, ‘टीसीएसने कोणतीही कर्मचारी कपार केलेली नाही आणि तशी कोणतीही योजना नाही. आम्ही कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर आणि कौशल्य वाढीवर भर देत आहोत.’ या बड्या कंपन्यांच्या ग्राहकांनीच आपल्या बजेटमध्ये कपात केल्यामुळे त्याचा परिणाम जॉब क्रिएशनवर झाल्याचे बोलले जात आहे.