Sun, Feb 24, 2019 03:04होमपेज › National › राजधानीत प्रथमच साजरी होणार भव्य शिवजयंती!

राजधानीत प्रथमच साजरी होणार भव्य शिवजयंती!

Published On: Feb 15 2018 2:00AM | Last Updated: Feb 15 2018 12:52AMनवी दिल्ली :

देशाच्या राजधानीत यंदा प्रथमच भव्य प्रमाणात शिवजयंती साजरी होणार असून, खा. संभाजीराजे छत्रपती यांनी त्याच्या आयोजनात विशेष पुढाकार घेतला आहे. त्यानिमित्ताने राजधानीत दोन दिवस मराठी संस्कृतीचे वैभव दाखविणार्‍या भरगच्च कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आल्याची माहिती संभाजीराजे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

यावेळी संभाजीराजे म्हणाले, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे यंदा भव्य प्रमाणात शिवजयंती साजरी करण्याचे ठरविण्यात आले आहे. गेल्या वर्षी रायगडावर होणार्‍या शिवजयंतीप्रसंगी पुढील शिवजयंती दिल्लीत साजरी करण्याची घोषणी मी केली होती, ती आता प्रत्यक्षात येते आहे. राजधानीत शिवजयंती साजरी करून त्यास ‘राष्ट्रोत्सवा’चे स्वरूप देण्यासाठी आम्ही ही सुरुवात केली आहे.