Mon, Nov 20, 2017 17:21होमपेज › National › शशिकलांकडे १४०० कोटींची संपत्ती?

शशिकलांकडे १४०० कोटींची संपत्ती?

Published On: Nov 15 2017 2:24AM | Last Updated: Nov 15 2017 2:06AM

बुकमार्क करा

चेन्‍नई : वृत्तसंस्था

‘अण्णा द्रमुक’च्या नेत्या आणि सध्या बेनामी संपत्तीप्रकरणी तुरुंगात असणार्‍या शशिकला यांच्या संपत्तीसंदर्भात नवी माहिती समोर आली आहे. प्राप्‍तिकर विभागाने शशिकला यांच्या विविध ठिकाणच्या मालमत्तांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये त्यांची संपत्ती 1400 कोटी रुपयांची असल्याचे समोर आले आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शशिकला यांनी यापूर्वी आपल्या संपत्तीचा खुलासा केला होता. त्यापेक्षाही ही मालमत्ता अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, यामध्ये कोणकोणत्या वस्तूंचा समावेश आहे, हे समजू शकले नाही. गुरुवारी शशिकला यांच्याशी संबंधित मालमत्तांवर छापा टाकण्यात आला होता. यामध्ये जया टी.व्ही. सह 187 ठिकाणांचा समावेश होता. बेनामी संपत्तीप्रकरणी शशिकला यांना यापूर्वीच 4 वर्षांची कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.