Mon, Nov 20, 2017 17:25होमपेज › National › हार्दिकची आणखी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल

हार्दिकची आणखी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल

Published On: Nov 14 2017 4:38PM | Last Updated: Nov 14 2017 5:13PM

बुकमार्क करा

अहमदाबाद : पुढारी ऑनलाईन 

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलच्या कथित सेक्‍स सीडीने तेथे चांगलीच खळबळ माजवली आहे. सोमवारी हार्दिकची एक कथित सेक्स सीडी समोर आली. यानंतर आता त्‍याचीच आणखी एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्‍यामुळे गेल्या २४ तासांपासून दोन सीडीसमोर आल्याने हार्दिकचा पाय आणखीनच खोलात जाण्याची शक्‍यता आहे.

मंगळवारी व्हायरल झालेल्या कथित सीडीमधील व्हिडिओमध्ये हार्दिक पटेल असल्याचा दावा केला जात आहे. १६ मे २०१७ रोजीच्या रात्री हार्दिक एका महिलेशी हॉटेलच्या खोलीत अश्लिल चाळे करत असल्याचा व्हिडिओ सोमवारी समोर आला होता. हार्दिकची कालची कथित सीडी अश्विन सांकडसरिया यांनी समोर आणली होती. या व्हिडिओमधील व्यक्ती हार्दिक पटेल असून, त्याच्यासोबत एक महिलाही असल्याचा दावा सांकडसरिया यांनी केला होता. तसेच आपला आणि भाजपचा कोणताही संबंध नसल्‍याचे सांकडसरिया यांनी स्‍पष्‍ट केले आहे. मात्र, व्हायरल झालेला व्हिडीओ खोटा आहे. भाजप अतिशय खालच्या थराचे आणि घाणेरडे राजकारण करत असल्‍याचे हार्दिकने म्‍हटले आहे. 

हार्दिक पटेलने व्हायरल झालेली सीडी चुकीची असल्याचे ४ दिवसांमध्ये सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान अश्विन सांकडसरिया दिले आहे. ‘हार्दिकच्या सीडीची न्यायवैद्यक चाचणी करण्यात यावी,’ अशी मागणीही त्यांनी केली. ‘काँग्रेसने १८२ जागांवर उमेदवार देताना हार्दिक पटेलचे मत विचारात घेतले जाईल, असे म्हटले होते. त्यामुळे नाराज झालेले काँग्रेसमधील काही लोकच अशाप्रकारे सीडी व्हायरल करत आहेत,’ असेही सांकडसरिया यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले.

दरम्‍यान, गेल्‍या दहा दिवसांपूर्वीच हार्दिक म्‍हणाला होता की, ‘‘माझी बदनामी करण्यासाठी अशी सीडी येणार आहे, त्‍याचा आनंद लुटा.’’