Sun, Aug 18, 2019 06:09होमपेज › National › लज्‍जास्‍पद; कारमधून ओढून युवतीवर दहा जणांकडून सामूहिक बलात्‍कार

लज्‍जास्‍पद; कारमधून ओढून युवतीवर दहा जणांकडून सामूहिक बलात्‍कार

Published On: Feb 12 2019 11:09AM | Last Updated: Feb 12 2019 11:09AM
लुधियाना : पुढारी ऑनलाईन 

पंजाबमधील लुधियाना येथे लज्‍जास्‍पद घटना घडली आहे. एका २१ वर्षीय युवतीवर दहा नराधमांनी सामूहिक बाल्‍कार केल्‍याचा प्रकार समोर आला आहे. पीडित युवती आपल्‍या मित्रासोबत लुधियानाधून इसावल गावास कारमधून जात असताना तिला या नराधमांनी कारमधून बाहेर ओडून तिच्‍यावर सामूहिक बलात्‍कार केला. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.  

पोलिसांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, पीडित युवती शनिवारी (ता.९ )रात्री आपल्‍या मित्रासोबत लुधियानावरुन इसावाल येथे जात असताना काही लोक दुचाकीवरुन त्‍यांच्‍या कारचा पाठलाग करत होते. या लोकांनी जनराव या गावात त्‍यांची कार थांबवली आणि कारवर दगडफेक केली. त्‍यानंतर  या युवतीस कारमधून जबरदस्‍तीने बाहेर काढून सिधवा येथे नेहण्‍यात आले. त्‍याठिकाणी त्‍या नराधमांनी आणखी सहा ते सात लोकांना बोलवले आणि तिच्यावर सामूहिक बलात्‍कार केला.  

पोलिस अधिकारी वी. एस. बरार यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, पीडित युवतीने या प्रकरणी तक्रार दिली आहे.  त्‍यामध्ये १० ते ११ लोकांनी माझ्यावर सामूहिक बलात्‍कार केल्‍याचे म्‍हटले आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.  पीडित युवतीची रुग्‍णालयात तपासणी केली असताा त्‍यातून सामूहिक बलात्‍कार झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.