Thu, May 23, 2019 23:03होमपेज › National › 'PM मोदी तुम्ही भ्रष्टाचारी, राजीनामा द्या'; राहुल गांधींचा खळबळजनक आरोप

PM नरेंद्र मोदी अनिल अंबानींचे चौकीदार: राहुल गांधी

Published On: Oct 11 2018 12:49PM | Last Updated: Oct 11 2018 1:17PMनवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

राफेल विमान खरेदी प्रकरणावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत सनसनाटी आरोप केला. राफेल प्रकरणात मोदींनी अनिल अंबानी यांचा फायदा केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचारी आहेत आणि त्यानी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधींकडून पंतप्रधान मोदींवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्याची ही पहिलीच वेळ आहे.  

राफेल करारावरून आम्ही पंतप्रधान मोदींनी संसदेत प्रश्न विचारले. पण याबद्दल ते एकही शब्द बोलण्यास तयार नाहीत. विशेष म्हणजे देशातील प्रत्येक व्यक्ती राफेल संदर्भात प्रश्न विचारत असताना संरक्षण मंत्री मात्र अचानक फ्रान्सच्या दौऱ्यावर गेल्या आहेत. अशी कोणती तातडीची गरज निर्माण झाली की त्यांना फ्रान्सच्या दौऱ्यावर जावे लागले असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला. 

करारात मोदींनी आग्रह केला होता की, अनिल अंबानी यांच्या कंपनीसोबतच भागिदारी करावी. मोदींनी देशातील जनतेचे 30 हजार कोटी रुपये अंबानी यांनी दिले. इतक नव्हे तर मोदी देशाचे चौकीदार नव्हे तर अनिल अंबानी यांची चौकीदारी करत असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. मी या देशातील युवकांना सांगू इच्छितो की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचारी आहेत आणि त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे.  

या आधी देखील राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. पण त्यांच्यावर कधीही भ्रष्टाचाराचे आरोप केले नव्हते. राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच मोदींना भ्रष्ट म्हटले आहे.