Wed, Jun 03, 2020 19:15होमपेज › National › साध्वींची उमेदवारी हे प्रतीकात्मक उत्तर : नरेंद्र मोदी

साध्वींची उमेदवारी हे प्रतीकात्मक उत्तर : नरेंद्र मोदी

Published On: Apr 21 2019 1:40AM | Last Updated: Apr 21 2019 12:49AM
नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपने दिलेली उमेदवारी हे हिंदू संस्कृतीला दहशतवादाशी जोडणार्‍यांना दिलेले प्रतीकात्मक उत्तर आहे आणि ते काँग्रेसला महागात पडेल, असे उद‍्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना काढले आहेत. 

इंग्रजी वृत्तवाहिनी ‘टाईम्स नाऊ’ला त्यांनी मुलाखत दिली. त्यावेळी उपरोक्‍त उद‍्गार पंतप्रधान मोदी यांनी काढले. 

मोदी म्हणाले, काँग्रेस एका ठराविक मोड्स ऑपरेंडीनुसार काम करते. त्याद्वारे समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट आणि न्यायाधीश बी. एच. लोया यांचा मृत्यू अशाप्रकरणात लोकांमध्ये गैरसमज पसरवला जात आहे. 

प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीचे समर्थन करताना मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, त्यांच्या आई सोनिया गांधी यादेखील जामिनावर बाहेर आहेत,असे सांगितले. ते म्हणाले, सोनिया, राहुल यांच्या निवडणूक लढण्यावर काही बोलले जात नाही. प्रज्ञासिंह यांच्याबाबतच हा प्रश्‍न का विचारला जातो? साध्वी असलेल्या महिलेशी अशा पद्धतीने वागले जाते?  सर्व एन्काऊंटर बनावट आहेत, न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू नैसर्गिक असूनही त्यांचा खून झाल्याचे सांगणे, ईव्हीएम मशिन घोटाळा, ही काँग्रेसची मोडस् ऑपरेंडी आहे.