Wed, Feb 20, 2019 15:49होमपेज › National › मिशन २०१९; रणनितीनुसार पंतप्रधान मोदींचे ‘राजकारण’

आता PM मोदी करणार एक वर्ष ‘राजकारण’

Published On: Jul 13 2018 9:49AM | Last Updated: Jul 13 2018 2:01PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

आगामी लोकसभेची तयारी सर्वच पक्षांकडून सुरु झाली आहे. त्यासाठी विशेष रणनिती करुन विरोधकांना कसे रोखता येईल याचे आखाडे बांधले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने आपल्या प्लॅननुसार मिशन २०१९च्या दृष्टीने राजकारणाला सुरुवात केली आहेत. एका कार्यक्रमात आपल्या ५ वर्षांच्या राजकीय वाटचालीबद्दल सांगताना PM मोदी म्हणाले होते की,पहिली चार वर्षे काम आणि पाचव्या वर्षी राजकारण.  यानुसार आता भाजप आगामी लोकसभेच्या तयारीला लागले आहे. भाजपने विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांच्या वेळेनुसार सभा, रॅली आणि कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. २०१४ नुसार यावेळीदेखील फक्त पंतप्रधान मोदीच टीव्हीवर दिसतील असा प्लॅन भाजपने तयार केला आहे.

भाजपच्या रणनितीनुसार पंतप्रधानर नरेंद्र मोदी फेब्रुवारी २०१९ पर्यंत ५० हून अधिक रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. यामध्ये देशातील १५० लोकसभा मतदारसंघ प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या प्लॅनची अंमलबजावणी सुद्धा सुरु झाली आहे. पंजाबमधील मुक्तसर येथे किसान रॅली करुन मिशन २०१९ला सुरुवात करण्यात आली आहे. आता पंतप्रधान मोदी २१ जुलै रोजी उत्तरप्रदेशातील शाहजहानपूर त्यानंतर बंगालमधील मिदनापूर, कर्नाटक आणि ओडिसातील किसान रॅलीमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.

मिशन २०१९ साठी पंतप्रधान मोदी यांच्याशिवाय भाजपाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यासह नेतेमंडळी देशात ५० सभा, रॅली काढणार आहेत. यामध्ये दोन ते तीन लोकसभा मतदारसंघात संपर्क करण्याची रणनिती भाजपने आखली आहे. रॅलीमधून पक्षाचे नेते सरकाच्या कामकाजाबद्दल चर्चा करणार असून निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना तयार राहण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत.

२०१८ च्या शेवटी अनेक राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी आतापासूनच भाजपने तयारी सुरु केली आहे. यावेळी २०१४ प्रमाणे यश मिळण्याची शक्यता कमी आहे. २०१४ ची लाट ओसरली असून त्यांना एकत्र आलेल्या विरोधकांचा सामना करावा लागणार आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगह या राज्यातील विधानसभा निवडणुका होणार आहेत. या ठिकाणी भाजपची सत्ता आहे. मात्र, राज्यातील सरकारविरोधी वातावरणात निवडणुका लढवण्याचे आव्हान भाजपसमोर आहे.

Tags : PM, Modi, BJP, Government, Loksabha, Election, 2019, Plan, Rally