Sat, Jan 18, 2020 23:16होमपेज › National › पंतप्रधानांच्या प्रधान सचिवपदी मिश्रा; मुख्य सल्‍लागारपदी सिन्हा

पंतप्रधानांच्या प्रधान सचिवपदी मिश्रा; मुख्य सल्‍लागारपदी सिन्हा

Published On: Sep 12 2019 1:44AM | Last Updated: Sep 11 2019 11:01PM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून गुजरात केडरचे 1972 च्या बॅचचे आयएएस अधिकारी पी. के. मिश्रा यांनी बुधवारी कार्यभार हाती घेतला. मोदी गुजरातमध्ये मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असतानाच्या काळात मिश्रा यांनी त्यांच्यासमवेत काम केले होते. पंतप्रधानांचे विश्‍वासू सहकारी म्हणून समजल्या जाणार्‍या नृपेंद्र मिश्रा यांनी गेल्या महिन्यात प्रधान सचिवपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्या जागी पी. के. मिश्रा यांची नियुक्‍ती करण्यात आली होती. 

दरम्यान, मोदी सरकारने पीएमओमध्ये ‘पंतप्रधानांचे मुख्य सल्‍लागार’ असे नवे पद तयार केले असून या पदावर माजी कॅबिनेट सचिव पी. के. सिन्हा यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात सिन्हा यांना पंतप्रधान कार्यालयात ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणजेच ओएसडी म्हणून नेमण्यात आले होते. सिन्हा यांना आता पंतप्रधानांचे मुख्य सल्‍लागार म्हणून बढती देण्यात आली आहे.