Sun, Nov 18, 2018 17:21होमपेज › National › कुंभमेळा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत

कुंभमेळा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत

Published On: Dec 07 2017 3:55PM | Last Updated: Dec 07 2017 3:55PM

बुकमार्क करा

नवी दिल्ली  : पुढारी ऑनलाईन 

भारताचा कुंभमेळ्याला युनेस्कोने ‘अमूर्त सांस्कृतिक वारसा’ ( Intangible Cultural Heritage ) म्हणून जाहीर केला आहे. जगभरातल्या ११ देशांतील विविध पारंपरिक वाद्य, पारंपरिक खेळ, हस्तकला आदींचा या यादीत समावेश आहे. युनेस्कोने आपल्‍या ट्विटर अकाऊंटवरून ही घोषणा करून भारताचे अभिनंदन केले आहे. 

कुंभमेळा हा एका धार्मिक सोहळा असून, तो दर तीन वर्षांतून एकदा भरतो. अलाहाबाद ( प्रयाग), उज्जैन, नाशिक ( त्रिंबकेश्वर), हरिद्वार, या चार वेगवेगळ्या ठिकाणी कुंभ मेळे भरत असतात. भारताच्या कानाकोपऱ्यातून कोट्यवधी हिंदू भाविक कुंभमेळ्यास हजेरी लावत असतात. 

कुंभमेळ्या बरोबर कझाकिस्तानचा पारंपरिक खेळ ‘अस्यक’ ( Assyk), पोर्तुगाल या देशाची ‘इस्ट्रेमोज’ ( Estremoz clay figures), जर्मनी या देशाचे ‘ऑर्गन हस्तकला’ व संगीत तर मलावी या देशाची मातीची भांडी ज्याला ‘सीमा’ (Nsima) याचा समावेश आहे. किरगिस्तान या देशाचा ‘कोकबोरू’ हा घोडस्वारीच्या खेळाचा तसेच इटली या देशाचा ‘नेओपोलिटीन’ या कलेचा समावेशही अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत करण्यात आला आहे. 

इराण या देशातील ‘चोगण’ (Chogan) या घोडेस्वारी खेळानेही या यादीत स्थान पटकाविले आहे. अझरबैजन या देशातील संगीत वाद्य ‘कमांचा’ (Kamancha) तर, ग्रीस या देशाचे ‘रेबीटीको’ या संगीत वाद्य, आयर्लंड या देशाचे ‘उईलेन’ ( Uilleann ) हे संगीत वाद्य अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून जाहीर करण्यात आले आहे.