Fri, Mar 22, 2019 04:19
    ब्रेकिंग    होमपेज › National › केरळ टुरिझमचे कर्नाटकच्या आमदारांना आमंत्रण; ट्विट केले डिलिट

‘केरळ टुरिझमचे कर्नाटकच्या आमदारांना आमंत्रण’

Published On: May 16 2018 10:39AM | Last Updated: May 16 2018 10:55AMनवी दिल्ली  : पुढारी ऑनलाईन

कर्नाटकात कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत  मिळाले नसल्याने विधानसभेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. भाजपकडे १०४ जागा असल्याने बहुमताचा आकडा गाठण्यासाठी इतर पक्षांचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित आमदारांना केरळ टूरिझमने आपल्या रिसॉर्टमध्ये फ्रेश होण्यासाठी या असे आमंत्र ट्विटरवरुन दिले होते. केरळ टूरिझमने कर्नाटकातील निकालानंतर सर्व आमदारांना सुरक्षित आणि मस्त अशा वातावरणात ताजेतवाने होण्यासाठी आमंत्रण देत असल्याचे म्हटले होते.

राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी भाजप, काँग्रेस, जेडीएसमध्ये रस्सीखेच सुरु आहे. काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा देऊन सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा केला आहे. तर, भाजपने राज्यपालांकडे  बहुमत सिद्ध करण्यासाठी ८ दिवसांचा अवधी मागितला आहे. त्यामुळे आता भाजपकडून फोडाफोडी केली जाऊ शकते असा आरोपही काँग्रेसकडून केला जात आहे. आता उमेदवार फोडले जाऊ नयेत यासाठी काँग्रेस आणि जेडीएस काळजी घेत आहेत. जेडीएस आपल्या आमदरांना एका रिसॉर्टमध्ये पाठवणार असल्याचे समजते. अशावेळी केरळ टूरिझमने केलेल्या ट्विटने सोशल मीडियावर जोरदार धमाल उडवली. काही वेळातच ते ट्विट डिलिट करण्यात आले.

कर्नाटक निवडणुकीत भाजप १०४, काँग्रेस ७८ आणि जेडिएसने ३८ जागांवर विजय मिळवला. काँग्रेस आणि जेडिएसने आघाडी करून सत्‍ता स्‍थापनेचा दावा केला आहे तर, काँग्रेसचे १३ आमदार आमच्या संपर्कात आहेत असे म्‍हणत भाजपनेही सत्‍ता स्‍थापनेचा दावा केला आहे. त्‍यामुळे कर्नाटकात सत्‍ता स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. 

Tags : Karnataka, Election, Result, Kerala, Tourism, Resort,