Sat, Sep 21, 2019 06:27होमपेज › National › काँग्रेस आमदाराच्या घराबाहेर स्‍फोट; एकाचा मृत्‍यू 

काँग्रेस आमदाराच्या घराबाहेर स्‍फोट; एकाचा मृत्‍यू 

Published On: May 19 2019 1:58PM | Last Updated: May 19 2019 1:58PM
नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

बेंगळुरूमधील काँग्रेस आमदाराच्या घराबाहेर रविवारी (ता.१९) सकाळी स्फोट झाला. या स्‍फोटात एकाचा मृत्यू झाला. या स्‍फोटाचे नेमके कारण आतापर्यंत स्‍पष्‍ट झालेले नाही. मिळालेल्‍या माहितीनुसार आमदार मुनीरथना यांचे  राजराजेश्वरी नगर येथील घराजवळ रविवारी सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी स्फोट झाला.

स्फोट झाला त्यावेळी जवळून जाणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. व्यंकटेश असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.  या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.