Thu, May 23, 2019 10:53
    ब्रेकिंग    होमपेज › National › J&K : पीएच. डी सोडून दहशतवादी झालेल्या मनन वाणीचा लष्कराकडून एन्काउंटर  

J&K : पीएच. डी सोडून दहशतवादी झालेल्या मनन वाणीचा लष्कराकडून एन्काउंटर  

Published On: Oct 11 2018 5:32PM | Last Updated: Oct 11 2018 5:31PMश्रीनगर : पुढारी ऑनलाईन 

अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून पीएच.डी चा अभ्यासक्रम सोडून हिजबूल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेमध्ये दाखल होऊन दहशतवादी झालेल्या मनन बशीर वाणीचा आज एन्काउंटर करण्यात आला. उत्तर काश्मीरमधील हंदवारा जिल्ह्यामध्ये लष्कराशी झालेल्या चकमकीत आणखी एका दहशतवाद्याचा गेम करण्यात आला. 

या वर्षीच्या सुरवातीला मनन पीएच. डी अर्धवट सोडून दहशतवादी गटामध्ये सामील झाला होता. जम्मु आणि काश्मीर पोलिस आणि लष्कराला २७ वर्षीय मनन येणार असल्याची इनपूट मिळाली होती. यावेळी त्याच्यासोबत आणखी दोन दहशतवादी होते. यावेळी त्याला आत्मसमर्पण करण्याचा आदेश दिला होता, पण त्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार करायला सुरवात केली. प्रत्युत्तरात झालेल्या  फायरिंगमध्ये मननचा खात्मा करण्यात आला.

दरम्यान, मनन वाणीचा खात्मा केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी हे संपूर्ण आपले नुकसान असल्याची प्रतिक्रिया दिली. काश्मीरमधील हिंसाचार थोपविण्यासाठी चर्चेमध्ये पाकिस्तानचाही समावेश केला पाहिजे असेही त्यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया देताना सांगितले.