Wed, Jun 19, 2019 08:09होमपेज › National › सीबीआयमध्ये रंगला 'बदली पे बदली' चा खेळ; कालचा निर्णय रावांनी आज केला रद्द  

सीबीआयमध्ये रंगला 'बदली पे बदली' चा खेळ; कालचा निर्णय रावांनी आज केला रद्द  

Published On: Jan 11 2019 5:51PM | Last Updated: Jan 11 2019 6:06PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक आलोक वर्मा यांनी काल (ता. १०) विश्वासू अधिकऱ्यांची बदली रद्द केली होती. सीबीआय संचालक आलोक वर्मा यांनी काल (ता. १०) विश्वासू अधिकाऱ्यांची झालेली बदली रद्द केल्यानंतर संध्याकाळीच त्यांची केंद्र सरकारकडून सीबीआय संचालक पदावरून उचलबांगडी करण्यात आली.

अधिक वाचा : अलोक वर्मा यांना सीबीआय संचालकपद बहाल

आलोक वर्मा यांची अग्नीशमन आणि होमगार्ड महासंचालकपदी वर्णी लावण्यात आली, पण नाराज वर्मा यांनी पदभार स्विकारण्यास नकार देत सरळ तत्काळ राजीनामा करण्यासाठी केंद्र सरकारला सांगितले. वर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर पुन्हा अंतरिम संचालक म्हणून आर. नागेश्वर राव यांची नियुक्ती करण्यात आली. राव यांनी पदभार स्विकारताच वर्मा यांनी बदली रद्दचा घेतलेला निर्णय रद्द करत त्या अधिकाऱ्यांची पुन्हा बदली केली. 

अधिक वाचा : आलोक वर्मा यांना क्‍लीन चिट

सीबीआय संचालक आलोक वर्मा सक्तीच्या रजेवर गेल्यानंतर अंतरिम संचालक म्हणून नागेश्वर राव यांची नियुक्ती केंद्र सरकारने केली. नागेश्वर राव यांनी पदभार स्विकारताच विशेष सीबीआय संचालक राकेश अस्थाना यांची चौकशी करत असलेल्या पोलिस उप पोलिस अधीक्षक ए. के. बस्सी, पोलिस अधीक्षक एस. एस. गुर्म, पोलिस महासंचालक एम. के. सिन्हा आणि संयुक्त संचालक ए के. शर्मा यांची बदली केली होती. 

अधिक वाचा : सीबीआय संचालक आलोक वर्मा पुन्हा सेवेत;विश्वासू सहकाऱ्यांची बदली केली रद्द

सीबीआयच्या संचालक पदावरून आलोक वर्मा यांना गुरुवारी हटवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत याबाबतचा निर्णय झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते मल्‍लिकार्जुन खर्गे आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. के. सिकरी यांच्या उच्चस्तरीय समितीची तब्बल दोन तास बैठक झाली. सीबीआय संचालकाची नियुक्‍ती पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचा समावेश असलेली समिती घेते.

अधिक वाचा : सीबीआय संचालक पदावरून वर्मांना हटवले

आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना या संचालकांनी परस्परांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे  सीबीआयची प्रतिमा मलिन झाली होती. त्यांच्यातील या संघर्षाची गंभीर दखल घेत, केंद्र सरकारने दोघांनाही सक्‍तीच्या रजेवर पाठविले होते. आलोक वर्मा यांनी या कारवाईच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या प्रकरणात मंगळवारी आलोक वर्मा यांच्या बाजूने कौल दिला. या निर्णयानुसार आलोक वर्मा पुन्हा एकदा संचालक पदावर विराजमान झाले. बुधवारी त्यांनी पदभार स्वीकारताच प्रभारी संचालक नागेश्वर राव यांनी केलेल्या अधिकार्‍यांच्या बदल्या त्यांनी रद्द केल्या होत्या.