Wed, Apr 24, 2019 10:00होमपेज › National › भारत जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था

भारत जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था

Published On: Jul 12 2018 1:38AM | Last Updated: Jul 11 2018 9:01PMनवी दिल्ली : वृत्तसंस्था

जगातील वेगाने विकसित होणारी अर्थव्यस्था म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून भारताने स्थान पटकावले असून, विशेष म्हणजे या स्पर्धेत भारत फ्रान्सलाही मागे टाकले आहे, असे जागतिक बँकेच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. 

संयुक्‍त राष्ट्र संघाने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये जगात अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेने पहिला क्रमांक पटकाविला. दुसरा क्रमांक चीनचा, तर तिसर्‍या क्रमांकावर जपान आहे. जर्मनी आणि ब्रिटन अनुक्रमे चौथा आणि पाचव्या क्रमांकावर आहे.

भारतामध्ये नोटाबंदी आणि जीएसटी कर प्रणाली लागू झाल्यानंतर अर्थव्यवस्थेत शिथिलता आली होती. मात्र, 2018-19 या आर्थिक वर्षात या निर्णयांचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय नाणे निधीने भारतातील अर्थव्यवस्था गतिमान होत असून, 2018-19 मध्ये जीडीपी 7.4 टक्के राहिला, तर आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून गुंतवणुकीत वाढ होऊन 2019 मध्ये जीडीपी 7.8 टक्क्यांवर राहील, असा अंदाज वर्तविला होता.  

संयुक्‍त राष्ट्र संघाने दिलेल्या माहितीनुसार भारतासाठी आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेला आपण मागे टाकले आहे. भारताची लोकसंख्या सध्या 1.34 अब्ज आहे, तर फ्रान्सची 67 दक्षलक्ष आहे. याचा तुलनात्मक अभ्यास केल्यास फ्रान्सपेक्षा भारतापुढे विविध आव्हाने असूनही, ही अर्थव्यवस्था गतिमान आहे, असे या अहवालात म्हटले आहे.