Sun, Aug 18, 2019 06:44होमपेज › National › असॉल्ट रायफल्स खरेदीसाठी सातशे कोटींचा करार

असॉल्ट रायफल्स खरेदीसाठी सातशे कोटींचा करार

Published On: Feb 12 2019 7:07PM | Last Updated: Feb 12 2019 6:55PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

भारतीय सैन्याला आधुनिक आणि उत्तम दर्जाच्या अमेरिकन असॉल्ट रायफल्स लवकरच मिळणार आहेत. भारताने अमेरिकेतील एका कंपनीशी सातशे कोटींचा करार केला आहे. त्यानुसार भारताला वर्षभरात ७२ हजार ४०० असॉल्ट रायफल्स भारताला द्याव्या लागणार आहेत, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिली. 

अमेरिका आणि युरोपातील अनेक देशांच्या सैन्याकडे अत्याधुनिक असॉल्ट रायफल्स आहेत. भारतानेही शस्त्रसज्जतेसाठी अशा रायफल्स सैन्याला त्वरीत मिळाव्यात म्हणून करार केला आहे. अमेरिकन कंपनीला करारानुसार एक वर्षाच्या आत ७२ हजार ४०० रायफल्स भारताला द्याव्या लागणार आहेत.  

दरम्यान, मागील काही काळापासून रायफल खरेदीचा प्रस्ताव रखडला होता. अखेर संरक्षण मंत्रालयाने रायफल खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या खरेदीसाठी भारताला ७०० कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. चीन सीमेवर तैनात असलेल्या जवानांना या रायफली देण्यात येणार आहेत. मागील वर्षी संरक्षण मंत्रालयाने असॉल्ट रायफल खरेदी आणि कार्बाइन खरेदीसाठी 'रिक्वेस्ट फॉर प्रपोजल्स' मागवले होते.