Tue, Jun 18, 2019 10:06



होमपेज › National › भारत स्वतःचे 'स्पेस स्टेशन' निर्माण करणार : इस्रो

भारत स्वतःचे 'स्पेस स्टेशन' निर्माण करणार : इस्रो 

Published On: Jun 13 2019 5:21PM | Last Updated: Jun 13 2019 5:32PM




नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

चांद्रयान-२ मोहिमेची घोषणा करण्यात आल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) मोठी घोषणा केली आहे. स्वतःच्या स्पेस स्टेशन निर्मितीसाठी भारताची योजना असल्याचे इस्रो अध्यक्ष के. सिवान यांनी स्पष्ट केले. 

ISRO Chief K Sivan: We are planning to have a space station for India, our own space station. pic.twitter.com/5lGcuPwCuA

— ANI (@ANI) June 13, 2019

आपल्या स्वतःच्या स्पेस स्टेशनसाठी योजना असल्याचे सिवान म्हणाले. सिवान म्हणाले, गगनयान मोहिम आपल्याला श्वाश्वत ठेवावी लागेल. मानवासह अंतराळ मोहिमेनंतर पुढील लक्ष स्वतःच्या स्पेस स्टेशनसाठी असेल. गगनयान मिशनला चालना देण्यासाठी हा प्रकल्प असेल. असेही त्यांनी नमूद केले. 

चांद्रयान-२ मोहिमेसाठी दिवस निश्चित करण्यात आला आहे.  १५ जुलैला चांद्रयान-२ प्रक्षेपित करण्यात येणार आहे. ५२ दिवसांच्या प्रवासानंतर साधारण ५ किंवा ६ सप्टेंबरला यान चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे. या मोहिमेच्या माध्यमातून चंद्राच्या दक्षिणेकडील भागाचा अभ्यास करता येणार आहे. अशा प्रकारचा अभ्यास करणारा भारत हा पहिलाच देश आहे.

Union Min Jitendra Singh: On eve of 75th Independence anniversary of India in 2022, ISRO has resolved to send its first human Mission into space, it could be before 2022. Exclusive special cell has been created, #Gaganyaan National advisory council to monitor planning&preparation https://t.co/HLazWElNbY

— ANI (@ANI) June 13, 2019

इस्रोकडून आतापर्यंत आखण्यात आलेल्या मोहिमांमध्ये चांद्रयान-२  मोहीम सर्वांत खडतर असल्याचे सिवान म्हणाले. चांद्रयान-२ मोहीम तीन टप्प्यात होणार आहे. यासाठी तब्बल ९७८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. अंतराळात स्पेस स्टेशन अस्तित्वात आल्यास ते स्टेशन पृथ्वीच्या वर जवळपास २५० मैल दुर असेल.