Sun, Nov 18, 2018 17:41होमपेज › National › अय्यर माफी मागतील : राहुल गांधी

अय्यर माफी मागतील : राहुल गांधी

Published On: Dec 07 2017 5:26PM | Last Updated: Dec 07 2017 5:26PM

बुकमार्क करा

नवी दिल्ली : प्रतिनिधी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणीशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अतिशय खालच्या भाषेत टीका केल्यानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही अय्यर यांच्या टीकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. अय्यर माफी मागतील, अशी अपेक्षाही राहुल यांनी व्यक्त केली आहे. 

अय्यर यांच्या टीकेवर राहुल गांधी म्हणाले, 'काँग्रेसवर टीका करताना भाजप आणि पंतप्रधान मोदी सातत्याने वाईट भाषेचा वापर करतात. काँग्रेसला एक संस्कृती आहे, एक वारसा आहे. पण, मणीशंकर अय्यर यांनी पंतप्रधान मोदींविषयी वापरलेल्या भाषेचे मी कधीही समर्थन करणार नाही. अय्यर माफी मागतील, अशी मला आणि काँग्रेसला अपेक्षा आहे.'

‘मुझको लगता है की, ये आदमी बहुत नीच किसमका आदमी है, इसमे कोई सभ्यता नही है, ऐसे मोकेपर इस किसमकी गंदी राजनीती करने की क्या आवशकता है?’ असे वादग्रस्त वक्तव्य आय्यर यांनी पंतप्रधान मोदी यांच्याविषयी केले आहे. अय्यर यांच्यावर राजकीय वर्तुळातून जोरदार टीका होत आहे.