Fri, Oct 20, 2017 08:33होमपेज › National › हिमाचल विधानसभेचे बिगुल वाजले

हिमाचल विधानसभेचे बिगुल वाजले

Published On: Oct 12 2017 5:10PM | Last Updated: Oct 12 2017 5:34PM

बुकमार्क करा

नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन 

केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. हिमाचल प्रदेशमध्ये 9 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 18 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त अचलकुमार ज्योती यांनी पत्रकार परिषदेत यांची माहिती दिली. 

हिमाचल प्रदेश विधानसभेत 68 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. यासाठीची आचारसंहिता लागू झाल्याचे ज्योती यांनी सांगितले. यंदा राज्यातील 136 निवडणूक केंद्रावर महिला प्रमुख असतील असेही त्यांनी सांगितले. राज्यातील प्रत्येक उमेदवाराला निवडणूक खर्चाची मर्यादा 28 लाख इतकी देण्यात आली आहे.

गुजरात निवडणुकीची घोषणा नंतर 

हिमाचल प्रदेश बरोबरच गुजरात विधानसभेची घोषणा अपेक्षित होती. मात्र आयोग गुजरातमधील निवडणुकांची घोषणा नंतर करणार आहे. या निवडणुका 18 डिसेंबरच्या आतच होतील. मात्र आता जर त्याची घोषणा केली तर आचारसंहितेचा कालावधी अधिक होईल, असे अचलकुमार ज्योती यांनी सांगितले.