Sun, Dec 08, 2019 06:34होमपेज › National › वीज तारेचा धक्‍का बसून बिबट्याचा मृत्यू

वीज तारेचा धक्‍का बसून बिबट्याचा मृत्यू

Published On: Jun 20 2019 10:57AM | Last Updated: Jun 20 2019 10:57AM
नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

हरियाणामधील गुरूग्राम जिल्ह्यातील सोहनामधील मांडवार येथे एका झाडाच्या बाजूस असलेल्या वीज तारांना स्‍पर्श झाल्‍याने बिबट्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरूवारी ( ता.२०) उघडकीस आली आहे. 

या बिबट्याचा मृतदेह वीज तारांमध्येच लटकलेला होता. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व मृत बिबट्यास काढण्याचे काम सुरू झाले. विजेचा धक्‍का बसल्‍याने बिबट्‍याचा मृत्‍यू झाल्‍याचे तपासात समोर आले आहे.