Mon, Dec 09, 2019 18:53होमपेज › National › HappyFathersDay : ‘बाबा’ पडद्यामागचा सुपरहिरो

HappyFathersDay : ‘बाबा’ पडद्यामागचा सुपरहिरो

Published On: Jun 16 2019 9:37AM | Last Updated: Jun 16 2019 9:25AM
पुढारी ऑनलाईन : सीमा पाटील

आपल्या इच्छा, आकांक्षा बाजूला ठेवून जगणारा बाबा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. आई सारखं त्याला व्यक्त होता येत नसेल पण प्रत्येकाच्‍या जीवनात तो खरा हिरो असतो. बाबा पडद्‍यामागचा हिरो असतो.

आपल्या इच्छा, आकांक्षा बाजूला ठेवून जगणारा बाबा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. आई सारखं त्याला व्यक्त होता येत नसेल पण प्रत्येकाच्‍या जीवनात तो खरा हिरो असतो. बाबा पडद्‍यामागचा हिरो असतो. मदर्स डे जेवढ्‍या मोठ्‍या प्रमाणात साजारा होताना दिसतो, तेवढ्‍याच प्रमाणात 'फादर्स डे' साजरा होताना दिसतो. 


heart'फादर्स डे'ची मूळ संकल्‍पना

'फादर्स डे' अलीकडे सगळीकडे रुजलेला दिसतो. हा दिवस साजरा करण्‍यापाठीमागे नेमके कारणीभूत ठरली ती पाच जुलै १९०७ रोजी वेस्‍ट व्‍हर्जिनियामध्‍ये कोळशाच्‍या खाणीतील दुर्घटना. याठिकाणी काम करणार्‍या ३६२ कामगारांचा मृत्‍यू झाला. त्‍यातील बहुतेक कामगार हे वडील होते. त्‍यांच्‍याकरीता झालेल्‍या मेमोरिअलमध्‍ये 'फादर्स डे'  ची एक छोटी सुरुवात झाली असंच म्‍हणावं लागेल. त्‍यानंतर 'फादर्स डे' ची सुरुवात एका मुलीच्‍या अथक प्रयत्‍नाने झाली. ती मुलगी म्‍हणजे सोनोरा स्‍मार्ट,  हिला पितृदिनाची जननी म्‍हणतात.  सोनोराला 'मदर ऑफ फादर्स डे' म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्‍यानंतर १९१० मध्‍ये वॉशिंग्‍टनमध्‍ये गव्हर्नरनी  १९ जून हा दिवस 'फादर्स डे' म्‍हणून जाहीर केला. १९१६ ला अमेरिकेचे अध्‍यक्ष विल्‍सन यांनी वॉशिंग्टनचे बटण दाबून टेलिग्राफ सिग्‍नल्‍सच्‍या मदतीने स्‍पोकेनेमध्‍ये अमेरिकेचा ध्‍वज फडकावून 'फादर्स डे' साजरा केला. १९६६ मध्‍ये  प्रेसिडेंट निक्सन यांनी जूनचा तिसरा रविवार हा 'फादर्स डे' म्‍हणून जाहीर केला.  तेव्‍हापासून जगभरात 'फादर्स डे' साजरा होत आहे.

heart'बाबा' नावाचा सुपर  हिरो

प्रत्‍येकाच्‍या आयुष्‍यातील आपले वडील हे  सुपर हिरो असतात.   मग कुणासाठी  बाबा, दादा, मामा, काका अशू शकतो. बाबा हा दोन अक्षराचा शब्‍द आयुष्‍याला आधार देण्‍याचे काम करतो. वडाच्‍या झाडाप्रमाणे नेहमी आपल्‍या पाठीशी खंबीर उभे राहण्‍याचे काम करत असतो.  प्रत्‍येकवेळी त्‍याला आपल्‍याबरोबर राहणे शक्‍य नसले तरीही तो मनाने आपल्‍या बरोबर राहत असतो. आपाल्याला काही पाहिजे असेल मग ते नवीन कपडे, पेन किंवा बरंच काही त्यावेळी बाबा आठवतो. आजारी असताना तो कधीकधी आपल्‍या बरोबर नसतो पण त्‍यावेळेस तो आपल्‍यासाठी ऑफीसमध्‍ये राबत असतो. 'बाबा' खरंतर फणसा सारखा असतो ..बाहेरुन काटेरी आतून गोड.. अशा या बाबासाठी आजचा एक दिवस पुरेसा नाही पण त्‍यानिमित्‍ताने सर्व बाबांना सलाम.  

heartसोशल  मीडीयामुळे चित्र बदलत आहे

आज पाश्चात्य देशात हा दिवस मोठ्‍या प्रमाणात साजारा होताना दिसतो.  मात्र, भारतात  'फादर्स डे' तितक्या प्रमाणात साजरा होताना दिसत नाही. सोशल मीडीयामुळे अलिकडे हे चित्र बदलत आहे. प्रत्येक जण हा दिवस आपल्‍यापद्धतीने साजरा करत आहे.  हा दिवस आपल्‍या वडिलांसाठी स्‍पेशल बनवण्‍याचा प्रयत्‍न करत असतो. आजची पिढी या निमित्‍ताने भेट वस्‍तू, त्‍यांच्‍यासोबत वेळ घालवणे किंवा आणखी काही प्लॅन करुन बाबांचा दिवस स्‍पेशल बनवयाचा प्रयत्न करताना दिसते. खरंतर आपले आयुष्‍य स्‍पेशल बनविणार्‍या बाबासाठी हे कमीच आहे. पण यामुळे तरी काहीजण आपल्‍या वडिलांना जाणून घेताना दिसतात. बाबा आपल्या वर्तमानाचा विचार करत असतात. त्‍यांच्‍या ओरडण्‍यात काळजी असते ती आपल्‍या भविष्‍याची.  प्रत्‍येक घराला आधार देण्‍याचे काम बाबा करत असतात. 

heart यशस्‍वी वडील व मुलांच्‍या काही जोड्‍या

राजकारण, समाजकारण, मनोरंजन अशा  प्रत्‍येक क्षेत्रात आपल्‍याला  अशा वडील व मुलांच्‍या यशस्‍वी जोड्‍या पाहावयास मिळतात. महाराष्ट्रातील काही नावे उदाहरणे बघायची म्हटली तर सुप्रिया सुळे आणि शरद पवार, नारायण राणे आणि नितेश, निलेश राणे, तसेच चित्रपट क्षेत्रातील अमिताभ बच्‍चन व अभिषेक बच्‍चन, विनोद खन्‍ना व अक्षय खन्‍ना, अनिल कपूर आणि सोनम कपूर, बाबा आमटे व प्रकाश आमटे,  सुधा मुर्ती व रोहन मुर्ती, सचिन तेंडुलकर व अर्जुन तेंडुलकर  अशा  बर्‍याच वडील व मुलांच्‍या जोड्‍या आपल्‍या क्षेत्रात जोडीने नाव गाजवताना दिसतात. या सर्वांच्‍या आयुष्‍यात बाबारुपी वडाच्‍या झाडाचे मार्गदर्शन लाभले आहे. त्‍यामुळे त्‍यांनी यशाचा पल्‍ला गाठला आहे. 

heartसरोगसीच्‍या माध्‍यमातून 'बाबा' बनण्‍याचे स्‍वप्‍न पूर्ण

वैदयकीय क्षेत्रातील अविष्कारामुळे लग्‍न न करता बाबा होण्‍याचे स्‍वप्‍न पूर्ण करता येत आहे. अलीकडे सरोगसीच्‍या माध्‍यमातून बॉलिवूडमध्‍ये बरेच जण वडील झाले आहेत. यामध्‍ये करण जोहर, तुषार कपूर  यांनी मुलाची जबाबदारी घेतली आहे. वडील म्‍हणून ते आपली जबाबदारी काटेकोरपणे पाळताना दिसतात. खरंतर हि बाबा पर्वाची सुरुवातच म्‍हणावी लागेल. आत्‍तापर्यत सिंगल मॉम  ऐकलं होतं पण आता सिंगल बाबा कानावर पडलं तर नवीन वाटायला नको.

कॉमन मॅन किंवा सेलिब्रिटी असो प्रत्‍येका्च्‍या आयुष्‍यात वडिलांची जागा एकच असते. आजच्‍या दिवशी प्रत्‍येकाच्‍या आयुष्‍यातील बाबारुपी वडाच्‍या झाडाला सलाम... heartheartheartheart