Fri, Mar 22, 2019 04:21
    ब्रेकिंग    होमपेज › National › भाजपचे राजकारण वाईट, पाठिंब्याबद्दल काँग्रेसचे आभार : कुमारस्वामी

चूक सुधारण्यासाठी काँग्रेससोबत : कुमारस्वामी

Published On: May 16 2018 12:33PM | Last Updated: May 16 2018 4:24PMबंगळुरू : पुढारी ऑनलाईन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  जेडीएस आणि काँग्रेस एकत्र येणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. मात्र पंतप्रधान आपल्या अधिकाराचा चुकीचा वापर करुन राज्यपालांवर दबाव आणू शकतात. हे भाजपचे राजकारण बरोबर नाही. कमी जागा मिळाल्या असूनही काँगेस आम्हाला मुख्यमंत्रीपद देत आहेत त्याबद्दल त्यांचे आभारी आहे असे कुमारस्वामींनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्याने जेडीएस काँग्रेसला सोडून जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. तसेच कर्नाटक भाजपचे प्रभारी प्रकाश जावडेकर किंवा भाजप नेते मला भेटल्याचे वृत्तात काहीच तथ्य नसल्याचे कुमार स्वामी यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले. 

कर्नाटकात किंगमेकर नाही तर किंग ठरणाऱ्या कुमारस्वामींची जेडीएसच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यांनी सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याचे पक्षाच्या आमदरांबरोबर झालेल्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. जेडिएस आणि काँग्रेसच्या मिळून ११६ जागा होत आहेत. काँग्रेसने दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याच्या आधारावरच जेडीएस सत्तास्थानेचा दावा करणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

आम्हाला दोन्ही पक्षांकडून प्रस्ताव आले आहेत. यावर काय निर्णय घ्यायचा याबाबत कोणतेही दुमत नाही. २००४ मध्ये केलेली चूक पुन्हा करणार नाही. ती सुधारण्याची संधी मला देवाने दिली आहे म्हणूनच आम्ही काँग्रेससोबत जाणार असल्याचे  जेडीएसचे विधीमंडळनेते कुमारस्वामी यांनी सांगितले. 

कुमारस्वामी यांनी भाजप घोडेबाजार करत असल्याचा आरोप केला. जेडीएसच्या आमदारांना १०० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. हा काळा पैसा कुठून येतो? आता आयकर विभागाचे अधिकारी कुठे आहेत असा सवालही कुमारस्वामी यांनी यावेळी केला.

काल कर्नाटक निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपला सर्वाधिक जागा मिळूनही सत्ता स्थापनेसाठी आवश्यक बहुमत न मिळाल्याने फोडाफोडीचे राजकारण होऊ शकते. तर काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा दिल्याने कुमारस्वामी सत्तास्थापनेचा दावा करुन मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील.

वाचा : 

केरळ टुरिझमचे कर्नाटकच्या आमदारांना आमंत्रण; ट्विट केले डिलिट

EVM बिघाडाचा घोळ मिटला; भाजप पुन्हा @104

कोण आहेत कुमारस्वामी?

Tags : Kumarswamy, JDS, karnataka, Election, Result, BJP, Congress,