Thu, May 23, 2019 23:17होमपेज › National › देशातील पहिलीच महिला SWAT टीम दिसणार लाल किल्ल्यावर

देशातील पहिलीच महिला SWAT टीम दिसणार लाल किल्ल्यावर

Published On: Aug 10 2018 2:26PM | Last Updated: Aug 10 2018 2:26PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

देशात आज महिलांची पहिली SWAT (स्‍पेशल वेपन अँड टॅक्‍ट‍िस टीम) टीम सेवेत रुजू होणार आहे. त्यांना दिल्लीत सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहे. या पहिल्या कमांडो टीममध्ये 36 महिलांचा समावेश आहे. यामध्ये पुर्वोत्तर राज्यातील महिला आहेत. त्यांना देशातील आणि परदेशातील तज्ज्ञांनी 15 महिने खडतर प्रशिक्षण दिले. जाणून घेऊया या टीमबद्दल...

देशात महिलांची पहिली SWAT टीम तयार करण्याची कल्पना दिल्लीचे पोलिस आयुक्त अमूल्य पटनायक यांनी पुढे आणली. त्यांनी म्हटले की, अतिरेकी हल्ले, बंधकांना सोडवणे किंवा इतर कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यासाठी ही टीम सक्षम आहे.

Image may contain: 1 person, text

अनेक मोठ्या देशांमध्ये अद्याप SWAT टीम नाही. अशावेळी भारताकडे महिला टीम असणे मोठी गोष्ट आहे. येत्या 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेची जबाबदारी या महिला कमांडोवर सोपवण्यात आली आहे.

Image may contain: outdoor

SWAT टीममध्ये 36 महिलांपैकी सर्वाधिक 13 महिला कमांडो आसामच्या आहेत. तर अरुणाचल प्रदेश, सिक्किम आणि मणिपूरमधी प्रत्येक 5, मेघालय- 4, नागालँड-2 आणि मिझोराम, त्रिपुरातील प्रत्येकी एका महिला कमांडोचा समावेश या टीममध्ये आहे.

हातात कोणतेही हत्यार नसताना या महिलांना समोरच्याशी लढण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यासाठी इस्त्रायलचे ‘कर्व मागा’चे प्रशिक्षण घेतले. याशिवाय त्यांना शस्त्रास्त्रे चालवण्याचेही खास प्रशिक्षण देण्यात आले आहे.

Image may contain: one or more people, people standing and outdoor

या महिला कमांडोंना मध्य आणि दक्षिण दिल्लीतील काही ठिकाणांवर तैनात करण्यात येईल. दिल्लीत महिलेच्या मदतीने आत्मघाती हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर संस्थेने दिली आहे. या महिला कमांडो अशा प्रकारच्या हल्ल्याला रोखू शकतात.

यातील सर्वाधिक महिला कमांडोंना दहशतवाद विरोधी पथकातील ‘पराक्रम’मध्ये तैनात केले जाणार आहे. पराक्रम मधील कमांडो अनेकमजली इमारतींवर चढणे, हॉटेल, बस किंवा मेट्रोतील बंधकांना वाचवण्यासाठी मोहिमेत सहभाग घेतात.

SWAT टीम मधील सर्व महिला पुर्वोत्तर राज्यातील असल्याने त्यांना प्रशिक्षणादरम्यान भाषेची अडचण येत होती. त्यासाठी त्यांनी उत्तर पूर्व राज्यातीलच एका इन्स्ट्रक्टरची नियुक्ती केली होती.

Image may contain: one or more people, people standing, outdoor and nature

दिल्‍ली पोलिस आणि कमांडो ट्रेनिंग सेंटर झारौदा कला आणि एनएसजी कमांडोंसाठीचे मानेसर येथील ट्रेनिंग सेंटरमध्ये या महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. पुरुषांसाठी 12 महिन्यांचे असलेले प्रशिक्षण महिलांना 15 महिने देण्यात आले. यातील 3 महिन्यांचे SWAT ट्रेनिंग खास प्रशिक्षकांनी दिले.

Image may contain: 5 people, people smiling, outdoor

कोणत्याही शस्त्राशिवाय लढणे, शत्रूवर हल्ला करणे, हल्ल्यापासून बचाव करणे, जंगलासह नागरी वस्तीत किंवा गर्दीच्या ठिकाणी मोहीम करण्याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. तसेच अतिमहत्वाच्या सुरक्षेची जबाबदारीही त्या पार पाडू शकतात. त्यांना स्फोटक पदार्थांची प्राथमिक माहितीही देण्यात आली आहे. याशिवाय आयईडीच्या वापराबद्दल त्यांना सांगण्यात आले आहे.

Image may contain: 1 person, shoes

अमेरिकेच्या धर्तीवर भारतातही SWAT कमांडोची टीम तयार करण्यात आली होती. यांचे प्रशिक्षण खडतर असते. कोणत्याही परिस्थितीत शत्रूचा खात्मा करण्याची क्षमता या दलामध्ये असते. यातील कमांडोना हवाई, जल किंवा जमिनीवरील कोणतीही मोहिम पूर्ण करण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले असते. इतकेच नाही तर अंधारातही त्यांना शत्रूला ओळखता येईल तसेच त्याच्याशी लढण्याचे प्रशिणक्ष दिले जाते. दहशतवादी आणि नक्षलवाद्यांविरोधातील मोहिमेची जबाबदारी यांच्यावर सोपवली जाते. 

No automatic alt text available.

मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यानंतर भारतात SWAT टीम तयार करण्‌याची गरज निर्माण झाली. त्यानंतर दिल्ली पोलिसांकडे याची जबाबदारी सोपवण्यात आली.