Tue, Jul 17, 2018 23:09होमपेज › National › ‘मोदी बोलते व्हा; खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा’ 

‘मोदी बोलते व्हा; खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा’ 

Published On: Apr 16 2018 5:26PM | Last Updated: Apr 16 2018 5:26PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

सामूहीक बलात्कार आणि हत्यांच्या प्रकारांमुळे देशभरात आंदोलने सुरू आहेत. अनेक ठिकाणी ‘निर्भयां’साठी कॅन्डलमार्च काढले जात आहेत. या प्रकरणांवरून काँग्रेस भाजपला धारेवर धरत आहे. अशातच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना ‘देशातील मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वच अल्पवयीन मुलींच्या अत्याचाराचे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा’असे सांगितले आहे. 

‘२०१६ मध्ये अल्पवयीन मुलींवरील बलात्काराचे १९ हजार ६७५ खटले दाखल झाले आहेत. हे खरंच लज्जास्पद आहे. देशाच्या मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी आणि खटल्यांमधील दोषींना शिक्षा व्हावी यासाठी पंतप्रधानांनी हे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावेत, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. या ट्विटसोबत राहुल गांधींनी ‘स्पिक अप’ म्हणजे ‘बोलते व्हा’ असा हॅशटॅगही वापरला आहे. 

कठुआ आणि उन्नाव येथे घडलेल्या घटनांतील दोषींना शिक्षा देऊ, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. पंतप्रधानांच्या याच वक्तव्यावरून राहुल गांधी यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. 

कठुआमध्ये एका ७ वर्षीय बकरवाल जमातीच्या मुलीवर आठवडाभर बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. तर उन्नावमध्ये भाजप आमदरांनी एका महिलेवर सामूहीक बलात्कार केला. सुरतमध्येही एका अल्पवयीन चिमुरडीवर बलात्कार करण्यात आला. दिल्लीतील निर्भया हत्याकांडांतर देशात पुन्हा एकदा लोक कठुआ प्रकरणातील मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत. सोशल मीडियावरही न्यायासाठी मोहीम चालवण्यात येत आहे. 
 

Tags : Rahul Gandhi, PM, Narendra Modi, Congress, BJP, Kathua, Rape