Fri, Mar 22, 2019 03:30
    ब्रेकिंग    होमपेज › National › पर्यावरण शास्त्रज्ञ पचौरींवर अखेर विनयभंगचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश 

पर्यावरण शास्त्रज्ञ पचौरींवर अखेर विनयभंगचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश 

Published On: Sep 14 2018 6:14PM | Last Updated: Sep 14 2018 6:14PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

भारतातील प्रख्यात पर्यावरण शास्त्रज्ञ  आणि ऊर्जा व संसाधन संस्थेचे माजी महानिदेशक आर. के. पचौरी यांच्यावर दिल्ली सत्र न्यायालयाने विनयभंगचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे २०१५ पासून न्यायालयात लढा देणाऱ्या पीडितेला मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाची पुढची सुनावणी २० ऑक्टोबरला होणार आहे. 

आर. के. पचौरी यांच्यावर एका महिला सहकाऱ्याने पचौरींनी त्यांचे विनयभंग केल्याचा आरोप केला होता. याबाबत १३ फेब्रुवारी २०१५ मध्ये एफआयआर दाखल करण्यात आली होती. त्यानंत आज दिल्ली सत्र न्यायालयाने आज पचौरींवर विनयभंगचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायाल्याच्या या निर्णयानंतर पीडित महिलेने आपल्याला दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया दिली. 

दिल्ली पोलिसांनी १ मार्च २०१६ ला १४०० पानी चार्जशिट दाखल केली होती. विनयभंगाचा गुन्हा दाखल होईपर्यंत पचौरी हे सरकारच्या हावामान बदलाच्या समितीचे अध्यक्ष होते.