Thu, May 28, 2020 23:50होमपेज › National › निवडणूक आयोगाने विश्वासार्हता गमावली, आचारसंहिता मोदींची प्रचारसंहिता झाली : काँग्रेस

निवडणूक आयोगाने विश्वासार्हता गमावली : काँग्रेस

Published On: May 16 2019 10:48AM | Last Updated: May 16 2019 10:48AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

पश्चिम बंगालमध्ये राजकीय आखाड्यात हिंसेने रौद्ररुप धारण केल्यानंतर निवडणूक आयोगाने एक दिवस आधी प्रचार थांबविण्याचा निर्णय घेतला. पण आयोगाच्या टायमिंगवरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले. दरम्यान, बसपा प्रमुख मायावती यांनीही निवडणूक आयोगावर आसूड ओढले. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी निवडणूक आयोग भाजपच्या मुख्यालयातून आदेश घेत आहे का? अशी विचारणा केली. 

अधिक वाचा : 'ममतांना ठरवून लक्ष्य केलं जात आहे, देशाच्या पंतप्रधानांना हे शोभत नाही'

आयोगाने पश्चिम बंगालमध्ये एक दिवस अगोदर प्रचार थांबविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला, पण त्यासाठी आज (ता.१६) रात्री १० ची वेळ निवडली. पीएम मोदींच्या आज बंगालमध्ये दोन सभा आहेत. जर त्यांना प्रचारबंदी करायचीच होती, तर आज सकाळपासूनच का केली नाही? 

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्चचिन्ह उपस्थित करताना विश्वासार्हताच गमावल्याचा गंभीर आरोप केला. देशातील प्रत्येक नागरिक घटनात्मक संस्थेच्या स्वतंत्रता, निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. निवडणूक आयोगाचा आदेश म्हणजे पीएम मोदींच्या पुर्वनियोजित सभा बाधित होऊ नयेत यासाठी त्यांना दिलेले गिफ्टच आहे, असा घणाघात सुरजेवाला यांनी केला.