Mon, Nov 20, 2017 17:24होमपेज › National › ‘पप्पू’ शब्द वापरण्यास निवडणूक आयोगाची बंदी

गुजरात विधानसभा निवडणुकीत 'पप्पू'वर बंदी!

Published On: Nov 15 2017 11:40AM | Last Updated: Nov 15 2017 11:40AM

बुकमार्क करा

अहमदाबाद: पुढारी ऑनलाईन

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अपमानकारक शब्द वापरल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने भाजपला दणका दिला आहे.  

भाजपने केलेल्या एका जाहिरातीमध्ये ‘पप्पू’ शब्द वापरण्यात आला होता. या जाहिरातीतून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यात आली होती. आयोगाने हा शब्द अयोग्य ठरवत त्याच्या वापरावर बंदी घातली आहे. 

सोशल मीडियावर राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यासाठी ‘पप्पू’ हा शब्द वापरला जातो. यामुळेच आयोगाने या शब्दाच्या वापरावर बंदी घातली आहे.